ऑनलाईनचा जमाना आहे. आता आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण सहज घरी मागवू शकतो. मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, बंगळुरू या मेट्रो शहरांमध्ये होम डिलेव्हरी मागवण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे.
जेवणासोबतच किराणा आणि हेल्थकेअरच्या वस्तूही थेट ऑनलाईन मागवण्याचं प्रमाण वाढलं आहे. यातील एक इंट्रेस्टिंग फॅक्ट् म्हणजे दिल्ली, बंगळुरू, मुंबईसहीत मेट्रो शहरात तब्बल 60 लाख अंडी मागवली गेली आहेत.
भारत डिजिटल होतोय. आपण सहज ऑनलाईन शॉपिंग करू शकतो. यामध्ये ऑनलाईन ग्रोसरी शॉपिंग करण्याचं प्रमाण वाढतंय. अगदी एक वडापाव ते घरातील सर्व सामान भरण्यापर्यंत सर्व गोष्टी ऑनलाईन मागवता येतात.
स्विगी इंस्टामार्ट (Swiggy Instamart) ने नुकताच एक सर्व्हे केला. जून 2021 ते जून 2022 दरम्यान तब्बल 90 लाख ग्राहकांनी ही सुविधा वापरली आणि यामधून काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
interesting facts on online sale and sale of condoms on swiggy instamart