नवी दिल्ली : केंद्राकडून राज्यांना एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन, बस डेपो, मेट्रो स्टेशन आणि इतर सार्वजनिक स्थानांवर केमिकल हल्ला होण्याच्या शक्यतेनंतर अलर्टचा इशारा दिलाय.
गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीनंतर, देशातील अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. दहशतवादी हल्ल्यासाठी केमिकलचाही वापर करू शकतात.
१ सप्टेंबर रोजी केंद्राकडून राज्यांना अलर्ट करणारं एक पत्र जारी करण्यात आलंय. ऑस्ट्रेलियामध्ये फसलेल्या एका दहशवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलंय.
इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि अशाच काही वस्तूंमध्ये विस्फोटकांचा वापर करून हा हल्ला घडवण्यात येऊ शकतो, अशी माहिती गुप्तचर संस्थांनी दिलीय.