डास चावल्यानंतर त्या ठिकाणी खाज का सुटते? हे आहे त्यामागचे शास्त्रीय कारण

जर एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदाच डास चावला असेल तर त्याला त्या भागात खाज येत नाही.

Updated: Jan 7, 2022, 01:05 PM IST
डास चावल्यानंतर त्या ठिकाणी खाज का सुटते? हे आहे त्यामागचे शास्त्रीय कारण title=

मुंबई : तुम्ही हे बऱ्याचदा अनुभवलं असेल की, आपल्याला शरीराच्या ज्याठिकाणी डास चावतो, त्याठिकाणी आपल्याला लाल रंगाची दादी उठते आणि नंतर त्या भागाला खाज येऊ लागलते.  परंतु असे का होते? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय? तर आज आम्ही तुम्हाला या यामागचे वैज्ञानिक कारण सांगणार आहोत? त्यापूर्वी हे लक्षात घ्या की याचा संबंध मानवी रक्ताशी आहे. तसेच तुम्हाला फक्त मादी डासच चावते आणि रक्त शोषण्याचे काम करते. नर डास माणसांच्या आजूबाजूला फिरतात पण चावत नाहीत. नर डास फुलांच्या रसाने त्यांची भूक भागवतात.

या कारणामुळे खाज सुटते

विज्ञान सांगते की, जेव्हा डास माणसाला चावतो आणि रक्त शोशून घेतो तेव्हा तो त्याची लाळ माणसाच्या रक्तात सोडतो. डासांच्या लाळेमध्ये अशी प्रथिने आणि अँटीकोआगुलंट्स असतात. ते शरीरात ऍलर्जी निर्माण करण्याचे काम करतात. ऍलर्जीचा प्रभाव कमी करण्यासाठी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय होते. त्यामुळे जेव्हा जेव्हा डास शरीरात लाळ सोडतात तेव्हा मानवी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ते ओळखते. संरक्षणासाठी, रोगप्रतिकारक प्रणाली हिस्टामाइन नावाचे रसायन सोडते, ज्यामुळे हळूहळू याचा प्रभाव कमी होतो.

संशोधकांचे म्हणणे आहे की, जर एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदाच डास चावला असेल तर त्याला त्या भागात खाज येत नाही. यालाही कारण आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा डास चावतात तेव्हा शरीरात रोगप्रतिकारक प्रतिक्रिया विकसित होत नाही, त्यामुळे खाज सुटत नाही.

एका संशोधनात असे म्हटले आहे की, डास चावल्यामुळे होणाऱ्या खाजमागे डासांच्या लाळेमध्ये असणारे रसायन असते, पण शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, लाळ शरीरात गेल्याने काही प्रतिक्रिया घडते ज्यामुळे आपल्याला खाज येते आणि काही वेळाने ती बरीही होते. .

खाज सुटते तेव्हा काय करावे?

हेल्थलाइनच्या अहवालानुसार, डास चावल्यानंतर खाज सुटते, परंतु तसे करणे टाळले पाहिजे अन्यथा त्या भागाची त्वचा खराब होण्याचा किंवा संसर्गाचा धोका वाढतो. जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा ती जागा अल्कोहोलने स्वच्छ करा. त्यानंतर तेथे मध लावा. मधामध्ये प्रतिजैविक आणि जंतुनाशक गुणधर्म असतात, जे त्या भागाला बरे करण्यास मदत करतात. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला डास चावतील तेव्हा त्या भागाला अजिबात ओरबाडू नका. हे टाळण्यासाठी तुम्ही मॉस्किटो रिपेलंट वापरू शकता.