मुंबई : वाहन चालण्यासाठी इंधनाची गरज असते. पेट्रोल, डिजेल किंवा आता तर इलेक्ट्रिकवर चालनाऱ्या गाड्या देखील बाजारात आल्या आहेत. परंतु पेट्रोल आणि डिजेलवर चालणाऱ्या गाड्यांची संख्या जास्त आहे. ज्यामुळे बरेचसे लोक इंधन भरण्यासाठी पेट्रेल पंपावर जाताता. आपल्यापैकी प्रत्येकजण एकदा तरी पेट्रोल पंपावरती गेला असेल, परंतु तु्म्ही कधी विचार केलाय का की, आपल्याला मिळणारं इंधन हे पेट्रोल पंपावरती कुठे आणि कसं साचवून ठेवलं जातं?
आपल्याला तर हे माहित आहे की, पेट्रोल पंपावर गेल्यावर आपण तेथील व्यक्तीला आपल्याला किती लिटर किंवा किती रुपयाचे इंधन हवं आहे ते सांगतो. ज्यानंतर ते तेथील मशीनवरती तो आकडा टाकतात आणि एका पाईपद्वारे इंधन किंवा पेट्रोल आपल्या गाडीत टाकतात.
आपल्या इथपर्यंत तर सगळं माहित आहे. परंतु या मशीनमध्ये किंवा त्या पाईपमध्ये पेट्रेल येतं कुठुन हा मोठा प्रश्न आहे?
तर आज आम्ही पेट्रोल पंपाच्या इंधन साठवणुकीच्या यंत्रणेबद्दल सांगणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पेट्रोल पंपामध्ये इंधन कसं साठवून ठेवलं जातं आणि ते कसं आपल्यापर्यंत पोहोचतं हे कळेल.
पेट्रोल पंपावरील टाक्या या पेट्रोल पंपाच्या खालच्या बाजूला असतात. तुम्ही पेट्रोल पंपावर लोखंडी किंवा धातूचे झाकण पाहिले असेल, जे जमिनीवर ठेवलेले असते. खरंतर तेथेच या इंधन साठण्याच्या टाक्या असतात.
ट्रकमधून येणारे तेल पेट्रोल पंपावर बांधलेल्या भूमिगत टाकीमध्ये साठवले जाते आणि तेथून ते मशीनच्या सहाय्याने वर खेचले जाते.
खरंतर ही मशीन एक प्रकारे हातपंपाचे काम करते, ज्यामुळे आपण त्या टाकीवर योग्य ती माहिती टाकली की, तेथून तेल निघते. या मशीनमधील इंधन थेट टाकीतून येते. तसेच पेट्रोल आणि डिझेलसाठी स्वतंत्र टाक्या असतात.
या इंधन टाक्या घरातील सामान्य टाक्यांप्रमाणे बनवल्या जात नाहीत, तर त्या विशेष तंत्रज्ञानाने तयार केल्या जातात. या टाक्या स्टीलच्या फॅब्रिकेटेड टाक्या असतात. हे घरगुती टाक्यांपेक्षा बरेच वेगळे असतात.
त्या किती मोठ्या असतात?
या इंधन टाक्या खूपच मोठ्या असतात, परंतु प्रत्येक पेट्रोल पंपानुसार त्यांची क्षमता बदलते. प्रत्येक पेट्रोल पंपावर वेगवेगळ्या आकाराच्या टाक्या बनवल्या जातात आणि या टाक्या बनवण्यासाठी आगाऊ परवानगी घ्यावी लागते आणि त्यांच्या क्षमतेच्या आधारेच त्यामध्ये पेट्रोल किंवा इंधन भरले जाते.