महागाईचा झटका, आता घरे खरेदी महागणार

 Inflation hits home buying : महागाईचा कहर पाहायला मिळत आहे. त्यातच आता घरे तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा परिणाम घर खरेदीवर होणार आहे. घरांची किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.  

Updated: Jan 25, 2022, 10:25 AM IST
महागाईचा झटका, आता घरे खरेदी महागणार title=

मुंबई : Inflation hits home buying : महागाईचा कहर पाहायला मिळत आहे. त्यातच कोरोनाचा काळ असल्याने याचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे. पेट्रोल-डिझेलनंतर खाद्य तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. मात्र, खाद्य तेलाच्या किमतीत घट झाली असली तरी पुन्हा यात वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे. आता घरे तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा परिणाम घर खरेदीवर होणार आहे. घरांची किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. ( (house prices will increase) 30 टक्के किमती वाढणार असल्याचा अंदाज बांधकाम व्यवसायातील क्रेडाई संघटनेने अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे घर घरेदी महागणार आहे. (house prices will increase by 30 percentage in 2022 )

क्रेडाईने 30 डिसेंबर ते 11 जानेवारी दरम्यानच्या कालावधीत देशात सर्व्हेक्षण केले. 1322 बांधकाम व्यवसायिकांना माहिती विचारत हा सर्व्हे केला होता. या माहितीच्या आधारावरुन स्पष्ट झाले आहे की, घरांच्या किंमती भविष्यात 30 टक्क्यांनी वाढणार आहेत. पर्यायाने घर खेरदी महागणार आहे. 2022 मध्ये घरांच्या किंमती ह्या 30 टक्क्यांनी वाढणार आहेत. कारण  बांधकाम साहित्य किंमत वाढली आहे. त्यामुळे  10 ते 20 टक्के ही वाढ अपेक्षित असल्याचे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे घर खरेदीत वाढ अपेक्षित आहे.

गेल्या दोन वर्षांपासून बांधकाम व्यवसायात मंदी दिसून आली. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन आणि कडक निर्बंध असल्याने अनेक विकास प्रकल्प आणि बांधकाम क्षेत्रातील प्रकल्प रखडलेले होते. तसेच बांधकामही ठप्प पडले होते. आता बांधकाम क्षेत्रात काही प्रमाणात तेजी असली तरी कच्चा माल महाग झाल्याने याचा परिणाम हा घर खरेदीवर होणार आहे. त्यामुळे घर खरेदी महागणार आहे, असे क्रेडाईने म्हटले आहे.