नवी दिल्ली : देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असताना देखील दिलासा देणारी बाब म्हणजे कोरोना या धोकादायक विषाणूवर मात करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आज देशात देशात कोरोनाबाधितांची संख्या ७० लाखांवर पोहोचली आहे, तर ६० लाख ७७ हजार ९७७ रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडले आहेत. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७० लाख ५३ हजार ८०७ इतकी झाली आहे.
India's #COVID19 tally crosses 70-lakh mark with a spike of 74,383 new cases & 918 deaths reported in the last 24 hours.
Total case tally stands at 70,53,807 including 8,67,496 active cases, 60,77,977 cured/discharged/migrated cases & 1,08,334 deaths: Union Health Ministry pic.twitter.com/Ynu0wOodzU
— ANI (@ANI) October 11, 2020
गेल्या २४ तासांत देशात नव्या ७४ हजार ९१८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ९१८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत या धोकादायक विषाणूने १ लाख ८ हजार ३३४ रुग्णांचा बळी घेतला असून सध्या ८ लाख ६७ हजार ४९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
तर सर्वात जास्त कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे. राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस कमी होत आहे. सध्या २ लाख २१ हजार १५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात शनिवारी ३०८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.