देशभरात कोरोनाच्या ८५,३६२ नव्या रुग्णांची नोंद; भारताने ५९ लाखांचा टप्पा ओलांडला

कोरोनामुळे आतापर्यंत देशातील ९३,३७९ लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. 

Updated: Sep 26, 2020, 09:51 AM IST
देशभरात कोरोनाच्या ८५,३६२ नव्या रुग्णांची नोंद; भारताने ५९ लाखांचा टप्पा ओलांडला title=

नवी दिल्ली: गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाच्या ८५३६२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर उपचार सुरु असलेल्या १०८९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५९, ०३,९३३ इतकी झाली आहे. यापैकी ९,६०,९६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर देशातील ४८,४९,५८५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, कोरोनामुळे आतापर्यंत देशातील ९३,३७९ लोकांना प्राण गमवावे लागले आहेत.

केईएम रुग्णालयात आजपासून कोव्हिशिल्ड लशीच्या चाचणीला सुरुवात

साधारण आठवडाभरापूर्वी भारतात प्रत्येक दिवशी ९० हजाराहून अधिक रुग्ण सापडत होते. त्यामुळे आरोग्य यंत्रणांसमोर बिकट आव्हान निर्माण झाले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत हा आकडा ९० हजाराखाली आला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही जवळपास तितकेच आहे. 

राज्यात प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार, एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित

7,02,69,975 samples tested up to 25th September for #COVID19. Of these, 13,41,535 samples were tested yesterday: Indian Council of Medical Research (ICMR) pic.twitter.com/MVBHC2DfAg

सध्याच्या घडीला महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. शुक्रवारी राज्यात १७,७९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर ४१६ जणांचा मृत्यू झाला. राज्यात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या १३,००,७५७ वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत ९,९२,८०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून अजूनही राज्यात २,७२,७७५ रुग्ण उपचार घेत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात लोक जास्त प्रमाणात एकमेकांच्या संपर्कात आल्याने मुंबईत कोरोनाने पुन्हा उसळी घेतल्याचे चित्र आहे. मुंबईत गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या ६३ टक्क्यांनी वाढली आहे. तर राज्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाच्या प्रादुर्भावाचे प्रमाण वाढले आहे.