मुंबई : रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. रेल्वेकडून प्रवाशांच्या सुविधांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. यासाठी गेल्या काही दिवसांपासून अनेक बदल केले जात आहेत. रेल्वे बोर्डाने दिलेल्या नव्या आदेशानुसार, एसी डब्यातून प्रवास करणारे प्रवाशांना जे फेस टॉवेल दिले जातात त्यांच्या ऐवजी आता स्वस्त, लहान, वन टाईन युज करण्यासारखे नॅपकिन दिले जातील. प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी रेल्वे प्रशासन सुविधांकडे विशेष लक्ष देत आहे. यापूर्वी प्रवाशांना नायलॉनचे ब्लॅकेंट देण्याचा आदेश काढण्यात आला होता.
सध्या एका फेस टॉवेलमागे 3.53 रुपये खर्च येतो. रेल्वेच्या सर्व महाप्रबंधकांना २६ जूनला एक पत्र पाठवण्यात आले. पत्रात बोर्डाने असे म्हटले आहे की, नव्या नॅपकिनसाठी खर्च कमी येईल कारण ते मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जातील. त्याचबरोबर ते आकारानेही लहान असतील. एसी डब्याच्या तिकिटात बेडरोलची किंमतही अॅड करण्यात येईल.
दोन दिवसांपूर्वी दुरांतो एक्सप्रेसच्या प्रवाशांनी अर्ध शिजलेल्या अन्नावरून तक्रार केली होती. आयआरसीटीसी समूहाच्या महाप्रबंधक देवाशीष चंदा यांनी सांगितले की, जेवण तयार करणाऱ्या कंपनी विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल.