रेल्वेकडून मोठी दिवाळी भेट, 11 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या होणार फायदा

रेल्वे बोर्डाने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) मूळ वेतनाच्या 42 टक्क्यांवरून 46 टक्के इतका वाढवला आहे.

Pravin Dabholkar | Updated: Oct 24, 2023, 08:32 AM IST
रेल्वेकडून मोठी दिवाळी भेट, 11 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या होणार फायदा  title=

Indian Railway DA Hike: भारतीय रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी महागाई भत्ता वाढवल्यानंतर आता रेल्वे बोर्डानेही यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) मूळ वेतनाच्या 42 टक्क्यांवरून 46 टक्के इतका वाढवला आहे. यावेळीही रेल्वे बोर्डाने डीएमध्ये 4 टक्के वाढ केली आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केल्याचा हा निर्णय घेताना आनंद होत असल्याचे बोर्डाने लिहिले आहे. हा बदल 1 जुलै 2023 पासून प्रभावी मानला जाईल. बोर्डाने 23 ऑक्टोबर 2023 रोजी 'ऑल इंडिया रेल्वे आणि प्रोडक्शन युनिट्स'चे महाव्यवस्थापक आणि मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांना या संदर्भात एक पत्र लिहिले.

15,000 कोटी रुपयांचा बोनस  

केंद्रीय मंत्रिमंडळाने 15 हजार कोटी रुपयांच्या बोनसला मंजुरी दिल्यानंतर रेल्वे बोर्डाने ही घोषणा केली आहे. यामध्ये सरकारी कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये 4 टक्के वाढीचाही समावेश आहे. कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या थकबाकीसह पुढील महिन्याच्या पगारात वाढीव डीएही मिळेल.

दिवाळीपूर्वी या घोषणेचे स्वागत 

दिवाळीपूर्वीच्या या घोषणेचे रेल्वे कर्मचारी संघटनांकडून स्वागत करण्यात येत आहे. 'कर्मचाऱ्यांना जुलैपासून डीए मिळणार होता, त्यामुळे तो मिळणे कर्मचाऱ्यांचा अधिकार होता. दिवाळीपूर्वी पैसे देण्याची घोषणा करण्याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो, असे  ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे सरचिटणीस शिव गोपाल मिश्रा म्हणाले. 

डीए ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे दिला जातो. त्याचा उद्देश महागाईचा (कर्मचाऱ्यांवर) परिणाम होणार नाही याची खात्री करणे हा आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस जाहीर केला होता. ही बोनसची रक्कम रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी देण्यात येणार आहे. याशिवाय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 42 टक्क्यांवरून 46 टक्के करण्याची घोषणा करण्यात आली.