मुंबई : प्रत्येक व्यक्तीची एक छंद असतो, त्याला तो जपायला फार आवडतो, कारण त्यातून त्याला पैसे जरी मिळत नसले तरी आनंद नक्कीच मिळतो. परंतु त्यातुनच काही लोकं आपल्या छंदाला आपल्या उपजिविकेचे साधन देखील बनवतात. तर काही लोकं आपल्या छंदासाठी पैसे मोजायलाही तयार असतात. हे छंद कोणत्याही प्रकारचे असू शकतात, जसे गायन, डान्स, विणकाम इत्यादी. परंतु तुम्हाला माहित आहे का? काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा अशा वस्तु जमा करायला आवडताता, ज्या जगात फारच कमी लोकांकडे उपलब्ध आहे आणि त्यासाठी ते कितीही पैसे मोजण्यासाठी तयार असताता.
नाणी गोळा करणे हा एक छंद आहे. ज्या लोकांचा हा छंद आहेत त्यांना Numismatists म्हणतात. हे लोकं काही जुनी नाणी विकत घेताता ज्याच्या बदल्याते ते समोरील व्यक्तीला पैसे मोजतात.
त्यामुळे तुमच्याकडे जर काही जूनी नाणी असतील तर तुम्ही देखील या संधीचा फायदा उचलून ती नाणी विकून पैसे कमावू शकता.
ही जुनी नाणी विकून लोकांना लाखो आणि करोडो रुपये मिळत आहेत. या नाण्यांना ऑनलाइन लिलावात चांगली किंमत मिळत आहे. 1,2,5 रुपयांच्या नाण्यांच्या किंवा नोटच्या बदल्यात तुम्हाला 10 लाख ते 1 कोटी मिळू शकतात. आमची भागीदार वेबसाइट डीएनएच्या अहवालानुसार, नुकत्याच झालेल्या ऑनलाइन लिलावात 1 रुपयाच्या नाण्यासाठी 10 कोटी पैसे देण्यात आले.
आता तुम्हा म्हणाल की, 1 रुपायाच्या या नाण्याला त्याच्या मुल्यापेक्षा इतके जास्त रुपये कसे काय मिळाले? ज्या नाण्यासाठी 10 कोटी रुपयांची बोली लावली जात आहे, ते किरकोळ नाणे असू शकत नाही. सर्वप्रथम, हे जाणून घेणे महत्वाचे आहे की त्या नाण्यात नक्की काय आहे? हे एक रुपयाचे नाणे ब्रिटिश राजवटीतील आहे. हे 1 रुपयाचे नाणे 1885 साली बनवण्यात आले होते. हे नाणे खूप जुने असल्याने, अशा नाण्यांची संख्या खूप कमी असल्याने यासाठी लोक कितीही किंमत मोजण्यासाठी तयार आहेत.
हे नाणे ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर नोंदवून तुम्ही ऑनलाइन बोलीसाठी लोकांना आमंत्रित करू शकता. या नाण्यासाठी तुम्ही 9 कोटी 99 लाख रुपयांपर्यंतच्या बोली लावू शकता. या जुन्या आणि दुर्मिळ प्रकारच्या नाण्यासाठी, तुम्हाला ऑनलाइन प्लॅटफॉर्म olx वर नोंदणी करावी लागेल. यानंतर, OLX वर विनामूल्य जाहिरात पोस्ट करून, तुम्ही बोली मागवू शकता, ज्यांना ही नाणी खरेदी करण्यात रस असेल, ते स्वतः तुमच्याशी संपर्क साधतील.
जगात असे अनेक लोक आहेत, ज्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे आणि त्यांचे छंद अद्वितीय आहेत. दुर्मिळ वस्तूंसाठी समोरासमोर पैसे देण्यास ते नेहमी तयार असतात. डीएनए मधील अहवालानुसार, इंडियामार्ट डॉट कॉम आणि कॉईनबाजार सारख्या वेबसाइट जुन्या आणि दुर्मिळ नाणी आणि नोटांच्या बदल्यात लाखो रुपये देतात.
आपण आपले नाव, ई-मेल, फोन नंबर इत्यादी माहिती देऊन या वेबसाइटवर नोंदणी करू शकता.
वेबसाइटवर नोंदणी केल्यानंतर, खरेदीदार आपल्याशी संपर्क साधतात आणि आपण बोलणी करू शकता. यामध्ये फसवणूक करणाऱ्यांचा ही धोका आहे. त्यामुळे व्यवहार करताना तो थोडा जपून करावा.