Digital Rupees: आनंद महिंद्रा यांचा नवा व्हिडीओ पाहिलात? पहिल्यांदाच केलं 'हे' काम...

Anand Mahindra Viral Tweet: आज आनंद महिंद्रा यांचे नावं देशाच्या उद्योजकांच्या यादीत महत्त्वाच्या स्थानावर घेतलं जाते. आनंद महिंद्रा (Anand Mahindra Tweet) हे सोशल मीडियावरही कायम सक्रिय असतात. ते आपल्या ट्विटर अकांऊटवरूनही अनेकदा लोकांच्या फायद्याची गोष्ट शेअर करताना दिसतात. 

Updated: Jan 27, 2023, 04:40 PM IST
Digital Rupees: आनंद महिंद्रा यांचा नवा व्हिडीओ पाहिलात? पहिल्यांदाच केलं 'हे' काम...  title=

Anand Mahindra Viral Tweet: आज आनंद महिंद्रा यांचे नावं देशाच्या उद्योजकांच्या यादीत महत्त्वाच्या स्थानावर घेतलं जाते. आनंद महिंद्रा (Anand Mahindra Tweet) हे सोशल मीडियावरही कायम सक्रिय असतात. ते आपल्या ट्विटर अकांऊटवरूनही अनेकदा लोकांच्या फायद्याची गोष्ट शेअर करताना दिसतात. कधी ते नव्या तंत्रज्ञानाशी संबंधित व्हिडीओज टाकतात तर कधी आपल्या स्वनुभावातीलही अनेक व्हिडीओज शेअर करत असतात. सध्या त्यांनी असाच एक व्हिडीओ (Video) शेअर केला आहे ज्यात ते फळविक्रेत्याच्या जवळ फळं विकत घेताना दिसत आहेत. परंतु ते नक्की कोणती फळं घेत आहे आणि त्यांनी हा व्हिडीओ का बरं शेअर केला आहे याचं उत्तर तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्याशिवाय मिळणार नाही. चला तर मग जाणून घेऊया या नव्या व्हिडीओबद्दल... (indian businessman anand mahindra shares a video of a fruit seller took 1st payment of digital rupee video goes viral)

आनंद महिंद्रा यांनी डिजिटल रूपयातून आपलं पहिलं पेमेंट केलं आहे. हो, डिजिटल रूपया ही संकल्पना प्रत्यक्षात साकार झाली आहे. तेव्हा आनंद महिंद्रा यांनी एका बाजारात जाऊन एका फळंविक्रेत्याकडे जाऊन आपलं पहिलं डिजिटल पेमेंट केले आहे. त्यांना याचा फोटो आपल्या ट्विटर अकांऊटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओनं सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहेत. रिझर्व्ह बॅकेच्या बॉर्ड (Reserve Bank Of India) मिटिंगनंतर त्यांनी एका फळविक्रेत्याकडे जात पहिलं ़डिजिटल पेमेंट केलं आहे. 

आनंद महिंद्रा यांनी डिजिटल रूपया म्हणजे ई-रूपयामधून आपलं पहिलं पेमेंट केलेलं आहे. त्याचबरोबर नव्या ई-रूपयांचा सुरूवात झाल्याचा श्रीगणेशा झाला आहे असं ट्विट (Anand Mahindra Tweet) त्यांनी दोन दिवसांपुर्वी केलं आहे. महिंद्रा एन्ड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्विटरमध्ये लिहिले की, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या एका बॉर्ड मिटिंगनंतर मी जवळच्या एका फळांच्या दुकानात गेलो तेव्हा तिथल्या बच्चे लाल सहानी यांच्याकडून मी फळं विकत घेतली आणि त्यांच्याकडून पहिलं डिजिटल पेमेंट केले आहे. ही डिजिटल इंडियाची सुरूवात आहे. असं ट्विट त्यांनी केले आहे. 

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी पुढे लिहिले आहे की, डिजिटल इंडिया इन एक्शन! पहिलं ई-पेमंट (E-payment) करून डाळिंब विकत घेतले आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.

हा व्हिडीओ सध्या सगळीकडेच तूफान व्हायरल झाला आहे. आत्तापर्यंत या व्हिडीओला 8 लाख लोकांनी पाहिले आहे. तुम्हीही अजून हा व्हिडीओ पाहिला नाहीत मग आत्ताच पाहा...