...म्हणून सख्ख्या भावा-बहिणीनंच बांधली एकमेकांशी लग्नगाठ!

पोलिसांनी या प्रकरणात संपूर्ण कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल केलाय

Updated: Jan 31, 2019, 05:11 PM IST
...म्हणून सख्ख्या भावा-बहिणीनंच बांधली एकमेकांशी लग्नगाठ! title=

अमृतसर : पंजाबमध्ये सख्खे भाऊ - बहिणीनच एकमेकांशी विवाह केल्याची घटना समोर आलीय... याचं कारण म्हणजे बहिणीला ऑस्ट्रेलियात स्थायिक होण्यासाठी ही खेळी रचण्यात आली. विवाहानंतर बहिणीनं खोटा पासपोर्ट तयार करून ऑस्ट्रेलियाचा विसा मिळवला. हे भाऊ-बहिण सध्या ऑस्ट्रेलियात आहेत. 

SBS.com.au नं दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत या दोघांचे कुटुंबीयही सहभागी होते. एका महिलेनं या घटनेची तक्रार पोलिसांकडे केल्यानंतर पोलीस तपासात ही घटना उघड झालीय. 

भाऊ ऑस्ट्रेलियाचा स्थायी रहिवासी आहे. बहिणीलाही भावाप्रमाणेच ऑस्ट्रेलियात दाखल व्हायचं होतं. त्यामुळे २०१२ साली या दोघांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खोटी कागदपत्रं बनवली... गुरुद्वारामधून खोटे विवाह प्रमाणपत्र बनवून घेतलं. ते उपनोंदणी कार्यालयात दिलं... या घटनेत दोन्ही आरोपींनी सामाजिक व्यवस्था, कायदे व्यवस्था आणि धार्मिक व्यवस्थेला धुळीला मिळवल्याची प्रतिक्रिया यानंतर व्यक्त होतेय. 

पोलिसांनी या प्रकरणात संपूर्ण कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल केलाय. त्यांच्यावर चुलत भावाचं नाव वापरून खोटं बँक अकाऊंट, खोटा पासपोर्ट आणि इतर खोटी ओळखपत्रं बनवून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. ऑस्ट्रेलियाचा जोडीदार व्हिजा मिळवण्यासाठी त्यांनी हे कृत्यं केलं. 

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, परदेशात स्थायिक होण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारची फसवणूक करतात... त्यापैंकी हा एक धक्कादायक प्रकार आहे.