नवी दिल्ली : १८ नोव्हेंवर २०१७ ला जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना धडा शिकवणारे वायुसेनेचे जवान गरूड कमांडो जेपी निराला यांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले. राजपथावर आज जेपी निराला यांच्या पत्नी आणि आईंकडे हे अशोक चक्र सोपवण्यात आलं.
भारताच्या इतिहासात दुस-यांदा भारतीय वायुसेनेच्या गरूड कमांडोला अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले. १८ नोव्हेंबरला दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत निराला हे शहीद झाले होते.
#AshokaChakra awarded to Late Air Force Commando JP Nirala, who lost his life in Bandipora encounter. President Kovind presents award to JP Nirala's mother and wife. #RepublicDay pic.twitter.com/S6E7pJysdP
— ANI (@ANI) January 26, 2018
निराला यांचं शौर्य पाहून त्यांन वन मॅन आर्मी म्हटले गेले होते. त्यांना त्यांच्या अद्वितीय अशा कामगिरीसाठी अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले. निराला यांच्याआधी १९७१ मध्ये भारतीय वायुसेनेचे राकेश शर्मा यांना अशोक चक्राने सन्माने करण्यात आले होते.
१८ नोव्हेंबरला दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीवेळी हे स्पेशल ड्युटीवर बांडीपोरमध्ये तैनात होते. निराला वायुसेनेच्या गरूड कमांडोच्या त्या टीममध्ये होते ज्या टीमने कुख्यात दहशतवादी जकी उर रहमान लखवीचा भाचा ओसामा जंगी याला मारले होते. या एन्काऊंटरमध्ये भारतीय सेनेने ६ दहशतवाद्यांना ठार केले होते.
या चकमकीमध्ये दहशतवाद्यांना चोख उत्तर देण्यासाठी जेपी निराला यांनी त्यांच्या एके ४७ रायफलमधून गोळीबार सुरू केला. त्यांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.