नवी दिल्ली : इंदिरा गांधी यांचे चिरंजीव संजय गांधी यांची मुलगी असल्याचा दावा एका महिलेने केलाय. तिने डीएनए टेस्ट करण्याची मागणीही केलेय. तिने आरोप केलाय की, आगामी सिनेमा 'इंदू सरकार' मध्ये दिवंगत नेता आणि त्यांची आई तथा माजी प्रंतप्रधान इंदिरा गांधी यांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आलेय.
प्रिया सिंग पॉल हिने तीस हजारी न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. त्यात तिने आपल्याला दत्तक घेतल्याचे कागदपत्र बनावट आहेत. तसेच तिने एका संम्मेलनात म्हटलेय 'इंदू सरकार' मध्ये चुकीची माहिती दाखविण्यात आली आहे. त्यामुळे मी गप्प राहणे शक्य नाही. यामुळे मला हे बोलणे भाग पडले आहे.
गेल्या महिन्यात ४८ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या प्रियाने 'इंदू सरकार' या सिनेमाला परवानगी दिल्याबद्दल केंद्रीय फिल्म मंडळाला विरोध केला. इंदिरा गांधी यांचा लहान मुलगा संजय गांधी १९८० मध्ये एका विमान अपघातात मृत्यू पावले.
जो सिनेमा काढलाय त्यात ३० टक्के भाग खरा असून ७० टक्के भाग काल्पनिक आहे. यात काहीही तथ्य नाही. चुकीच्या घटना दाखवून लोकांना प्रेरित केले जात आहे, असे तिने म्हटले. दरम्यान, मला लहानपणी कोणीतरी दत्तक घेतले. आणि मोठे झाल्यावर सांगितले की, संजय गांधी खरे वडील (जैविक) आहेत.
संजय गांधी यांचा मित्र असल्याचा दावा करणारे गोस्वामी सुशीलजी महाराज या व्यक्तीने न्यायालयात शपथपत्र दाखल केले आहे. यात म्हटले मला आठवतेय की, संजय गांधी यांची एक मुलगी होती. ती लग्न होण्याआधीच जन्मली. मधुर भांडारकरची 'इंदू सरकार' १९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. ही सिनेमा २८ जुलैला प्रदर्शित होत आहे.