ओठांना लिपस्टिक, कपाळावर टिकली आणि साडी, IAS अकॅडमीत तरुणाने महिलेच्या वेशात केला आयुष्याचा शेवट

उत्तराखंडच्या मसूरीतल्या लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीतील स्टाफ क्वार्टरमध्ये एका 22  वर्षांच्या तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.  माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेतला.

राजीव कासले | Updated: Oct 18, 2024, 07:45 PM IST
ओठांना लिपस्टिक, कपाळावर टिकली आणि साडी,  IAS अकॅडमीत तरुणाने महिलेच्या वेशात केला आयुष्याचा शेवट title=

उत्तराखंडच्या मसूरीतल्या लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीतील (LBSNAA) एका 22  वर्षांच्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अकादमीतील स्टाफ क्वार्टरमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणाचा पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे. मुलगा जम्मू-श्रीनगरमधल्या पौडी गढवाल इथला राहाणारा होता. हा तरुण अकादमीत मल्टी टास्क डिपोर्टमेंटमध्ये कामाला होता. 

आधी मेकअप केला नंतर आत्महत्या
धक्कादायक म्हणजे आत्महत्येपूर्वी या तरुणाने महिलांसारखी वेशभूषा केली होती. हातात बांगड्या, कपाळावर टिकली, ओठांना लिपस्टिक आण साडि परिधान केली होती. यामुळे तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं आहे. मृत तरुण हा आपल्या सरकारी क्वार्टरमध्ये एकटाच राहात होता. आत्महत्येचा आधी रात्री उशीरा तो आपल्या रुममध्ये गेला. पण सकाळी नेहमीच्या वेळेत कामावर पोहोचला नाही. त्यामुळे त्याचा सहकारी कर्मचारी रुमवर पोहोचला. पण दरवाजा आतून बंद होता. सहकाऱ्याने दरवाजा ठोठावला पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याला थोडा संशय आला. बराच वेळ थांबल्यानंतर अखेर सहकाऱ्याने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. 

पोलिसांबरोबर कर्मचाऱ्यांनाही धक्का
पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतर त्यांनी दरवाजा तोडला आणि रुममध्ये प्रवेश केला. आतल दृष्य बघताच पोलिसांबरोबरच इतर कर्माचारीही हैराण झाले. साजश्रुंगार करुन गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह घराच्या छताला लटकला होता. पोलीसांनी मृतदेह खाली उतरवत तपास सुरु केला. तरुणाचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून आत्महत्येचं कारण शोधलं जात आहे. ही आत्महत्या आहे की हत्या या दृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी तरुणाच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली असून मृतेदह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून देण्यात आला आहे. 

आत्महत्येपूर्वी या तरुणाने आपला व्हॉट्सअॅप डिपीसुद्धा बदला होता. डिपीतला फोटोतही या तरुणने साडी आणि मेकअप केला होता. आत्महत्येचं कारण सेक्शुअल डिसॉर्डर (Sexual Disorder) होतं का यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. 

याआधीही अशीच घटना
सहा महिन्यांपूर्वी उत्तराखंडमधल्या उधमसिंह नगर जिल्ह्यातील पंतनगर विमानतळावर तैनात असलेल्या एका सहाय्यक मॅनेजरचाही अशाचप्रकारे मृतदेह आढळला होता. या तरुणानेही होठांवर लिपस्टिक, कपाळावर टिकली आणि साडी परिधान केली होती. या दोन आत्महत्यांचा परस्पराशी काही संबंध आहे की नाही याचाही पोलीस शोध घेत आहेत.