भुवनेश्वर : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ)ने जमीनीहून जमीनीवर निशाणा साधणाऱ्या बॅलिस्टिक मिसाइल 'प्रहार'चे गुरूवारी यशस्वी परीक्षण करण्यात आले. ओडिशाच्या बालासोरमध्ये इंटिग्रेटेड टेस्ट रेंज (आयटीआर) च्या लॉंचिंग कॉम्प्लेक्समध्ये दुपारी 1 वाजून 35 मिनिटांनी मुसळधार पावसात याचे परिक्षण करण्यात आले.
.@DRDO_India today successfully flight tested ‘Prahar’, the indigenously developed surface-to-surface tactical missile from Launch Complex-III, ITR, Balasore.
Smt @nsitharaman congratulates @DRDO_India , @adgpi and the Indian Industry for this achievement. pic.twitter.com/5euXaSoFuj
— Raksha Mantri (@DefenceMinIndia) September 20, 2018
मोबाइल लॉंचरच्या मदतीने हे मिसाइल लॉंच केल्याचेही वृत्त आहे. प्रहार मिसाइलची मारक क्षमता 150 कि.मी आहे. या मिसाइलची लांबी 7.32 मीटर असून याचा व्यास 420 मिलीमीटर आहे. याचे वजन 1.28 टन असून यामध्ये 200 कि.ग्रॅ वाहनाची क्षमता आहे.
'प्रहार' मध्ये अनेक शस्त्रांची नेआण करण्यासोबतच एका वेळेस विविध लक्ष्य उद्धस्त करण्याची क्षमता आहे. संरक्षणमंत्री निर्मला सितारामण यांनी याचे यशस्वी परिक्षणानंतर डीआरडीओ, सेना आणि सर्व संबंधित एजंसीचे अभिनंदन केलं. यामुळे देशाती सुरक्षा क्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.
मिसाइल लॉंच करण्याआधी आयटीआरच्या आजुबाजूच्या गावातील लोकांना वेगळ्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आलं होतं. या परिक्षणावेळी सेना प्रमुख जनरल बिपिन रावत, डीआरडीओ प्रमुख डॉ.जी सतीश रेड्डी आणि कई वरिष्ठ अधिकारी आणि वैज्ञानिक उपस्थित होते.