India Dangerous Weapon: कोणत्याही हल्ल्यासाठी भारत किती तयार आहे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

युक्रेन आणि रशियामध्ये सध्या युद्ध सुरु आहे. ज्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष या देशांकडे लागून राहिलं आहे.

Updated: Mar 1, 2022, 09:29 PM IST
India Dangerous Weapon: कोणत्याही हल्ल्यासाठी भारत किती तयार आहे? जाणून घ्या संपूर्ण माहिती title=

मुंबई : युक्रेन आणि रशियामध्ये सध्या युद्ध सुरु आहे. ज्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष या देशांकडे लागून राहिलं आहे. या दोघांमध्ये कोणाचा विजय-परायज होईल, या व्यतिरिक्त आपल्या देशावर याचा परिणाम होणार नाही ना असा प्रश्न अनेक देशांच्या नागरीकांना पडला आहे. तसेच आपल्या भारतावर जर हल्ला झाला किंवा तशीच युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, तर काय होईल? यासाठी भारत किती तयार आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

तर आज आम्ही तुम्हाला भारत अशा हल्ल्यांसाठी किती तयार आहे आणि भारताकडे अशी कोणती वेगळी शस्त्रे आहेत, ज्याच्या माध्यमातून तो शत्रुशी लढू शकतो. याबद्दल सांगणार आहोत. जे जाणून घेतल्यावर तुम्हा आपण भारती असल्याचा गर्व वाटेल.

काली

'काली' की ताकत का नहीं है कोई तोड़

भारताकडे सर्वात धोकादायक असे 'काली' हे अस्त्र (Kali Weapon)  आहे. जे शत्रूचा कोणताही हल्ला हाणून पाडू शकतात. या महाकाय रणगाड्यांसमोर अत्याधुनिक लढाऊ विमाने, प्रगत क्षेपणास्त्रेही निकामी झाली आहेत. क्षेपणास्त्रे, लढाऊ विमानांव्यतिरिक्त 'काली' सशस्त्र ड्रोन आणि अवकाशात फिरणारे उपग्रह देखील पाडू शकतात.

हे शक्तिशाली शस्त्र इलेक्ट्रो मॅग्नेटिक वेव्हजचे वादळ निर्माण करते, त्याच्या संपर्कात येणारे प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरण तेथेच थांबते आणि त्याचा चक्क चुरा होतो.

राफेल

राफेल जेट से उड़ी है चीन-पाकिस्तान की नींद

भारताकडे दुसरं सर्वात धोकादायक शस्त्र आहे राफेल  (Rafale Jet) सारखे 4.5 पिढीचे घातक लढाऊ विमान आहे, यामध्ये एकदा इंधन भरले की ते 3500 किमीपर्यंत मारा करू शकते.

जगातील तीन सर्वात घातक क्षेपणास्त्रे त्यात बसवण्यात आली आहेत. या विमानात स्मार्ट रडार बसवलेले आहे, जे त्याच्याभोवती फिरणारा धोका किंवा टार्गेट ठरवून ते लॉक करते. यानंतर राफेलमधून सोडलेले क्षेपणास्त्र ते त्याच्या टार्गेटला शोधून नष्ट करते. या विमानाची ही दुरदृष्टी क्षमता त्याला फार मोठी ठरवते.

स्वॉर्म ड्रोन किंवा स्वॉर्म आर्मी

दुश्मन के लिए काल है ड्रोन स्वार्म आर्मी

युद्धाच्या बदलत्या काळात सशस्त्र ड्रोनचे महत्त्व पाहून भारताने स्वतःची 'स्वॉर्म ड्रोन' आर्मीही विकसित केली आहे. या ड्रोन तंत्रज्ञानामध्ये एक मदर ड्रोन आहे, ज्यातून अनेक छोटे ड्रोन बाहेर येतात, जे वेगवेगळ्या टार्गेटवर हल्ला करण्यास सक्षम आहेत. लहान आकारमानामुळे शत्रु देखील त्याला सहजपणे शोधू शकत नाहीत. ते मोठ्या संख्येने एकजुटीने हल्ला करत असल्याने, त्यामुळे शत्रूच्या विमानविरोधी तोफा किंवा क्षेपणास्त्रेही त्यांच्याविरुद्ध दे लढू शकतात किंवा त्याला निकामी करु शकतात. भारत, चीन, अमेरिका अशा मोजक्याच देशांकडे हे तंत्रज्ञान आहे.

अग्नी-5

अग्नि-5 के निशाने पर है पूरा चीन

चौथे आणि सर्वात महत्वाचे अग्नी-5 हे भारताचे आंतरखंडीय क्षेपणास्त्र (अग्नी-V ICBM) आहे. चीनसारख्या शत्रू देशांना डोळ्यासमोर ठेवून भारताने हे क्षेपणास्त्र बनवले आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 5000 ते 8000 किमी आहे. म्हणजेच दिल्लीतून गोळीबार झाला तर चीनची राजधानी बीजिंगसह सर्व मोठ्या शहरांना ते टार्गेट करू शकते. याचे वजन 50 हजार किलोपेक्षा जास्त आहे.

हे शस्त्र ताशी 29, 401 किलोमीटर वेगाने शत्रूवर हल्ला करते. सोबत आण्विक बॉम्बही तो आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतो. या क्षेपणास्त्राच्या सामर्थ्यामुळे चीनही भारतासमोर झुकलेला आहे.

 ब्रह्मोस

दुनिया में सबसे खतरनाक है ब्रह्मोस मिसाइल

भारताकडे असलेला पाचवा सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्र म्हणजे 'ब्रह्मोस' हे एक विध्वंसक शस्त्र आहे, ज्याचे उत्तर जगातील कोणत्याही देशाकडे नाही. हे जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे. हे जमिनीपासून खूप कमी उंचीवर उडते, त्यामुळे रडारसुद्धा ते पकडू शकत नाहीत. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या क्षेपणास्त्रात एकदा टार्गेट सेट केलं की, ते आपोआप त्याचा पाठलाग करून त्याला नष्ट करते.

शत्रूचे विमान किंवा ड्रोनने मार्ग बदलण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा पाठलाग करताना हे क्षेपणास्त्रही आपला मार्ग बदलते. त्याची रेंज सध्या 290 किमी आहे, परंतु भारताने आता 400 किमीची रेंज असलेले ब्राह्मोस बनवले आहे.

अणू बॉम्ब

सभी हथियारों का बाप है परमाणु बम

सर्वात शेवटचे परंतु सर्वात धोकादायक आहे ते न्युक्लियर वेपन, म्हणजेच अणू बॉम्ब. हे शस्त्र सर्व बॉम्बचे जनक आहे. हा बॉम्ब केवळ कोणतेही शहरच नाही, तर कोणत्याही देशाला एका क्षणात उद्ध्वस्त करण्यास सक्षम आहे. जगातील 204 देशांमध्ये सध्या भारतासह केवळ 8 देशांकडे हे अण्वस्त्रे आहेत.

तसेच, भारताने अणुबॉम्बबाबत प्रथम वापर न करण्याचे धोरण जाहीर केले आहे, पण त्याच्यावर हल्ला झाल्यास आपल्या शत्रूलाही सोडणार नसल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे.

जमीन आणि हवेतून अणुबॉम्ब डागण्याची क्षमता भारताने विकसित केली आहे. तर आता पाण्यातून अणुबॉम्ब सोडण्याच्या क्षमतेवर काम सुरू आहे. हे काम पूर्ण होताच भारताचे अण्वस्त्र त्रिकूट पूर्ण होईल आणि ते आपल्या शत्रूवर कुठूनही पलटवार करू शकतील.