नवी दिल्ली : Bihar बिहारमधील सीतामढी जिल्ह्याला लागून असणाऱ्या नेपाळच्या सीमेपाशी शुक्रवारी नेपाळ सीमा पोलिसांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एका स्थानिकाचा मृत्यू झाला. यामध्ये दोघंजण जखमी झाल्याचंही वृत्त आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ४५ वर्षीय भारतीय़ नागरिक असणाऱ्या लगन यादवला नेपाळ पोलिसांनी ताब्यात घेतलं घेतलं आहे.
सशस्त्र सीमा दलाच्या राजेश चंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ८ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. चंद्र यांनच्या माहितीनसार परिस्थिती सध्या नियंत्रणात असून तात्काळ स्तानिक नेपाळ एपीएफशी संपर्क साधण्यात आला. या भागातील स्थानिक नागरिक आणि नेपाळच्या सशस्त्र पोलीस दलात ही बाचाबाची झाली. या घटनेमध्ये २२ वर्षीय विकेश यादवला पोटात गोळी लागल्यामुळं त्याचा मृत्यू झाला. तर, (२४) उदय ठाकूर आणि (१८) उमेश राम जखमी झाल्यामुळं त्यांना सीतामढी येथीलच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
स्थानिकांच्या म्हणण्याप्रमाणं एपीएफ जवानांनी लगन यादव यांच्या सुनेच्या परिसरात असल्यावरुन हरकत दर्शवली जेव्हा त्यांला त्यांनी भारतातील काही मंडळींशी बोलताना पाहिलं.
लगन यादव यांची सून ही नेपाळची आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे दोन्ही देशांच्या सीमाभागात नातेसंबंध आहेत. त्यामुळं नातेवाईकांच्या भेटीसाठी सहजच दोन्ही देशांच्या भागामध्ये अनेकांची ये- जा सुरु असते. पण, एपीएफ कर्मचाऱ्यांनी या भेटीगाठींवर हरकत दर्शवली ज्यामुळं स्थानिक आणि नेपाळ पोलिसांमध्ये वादाची ठिणगी पडली. ज्यानंतर भारतातून जवळपास ७५ ते ८० जण घटनास्थळी जमले होते. ही गर्दी पांगवण्यासाठी म्हणून सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यानं हवेत गोळी झाडली. पण, त्यानंतर शस्त्र हिसकावून घेतलं जाण्याच्या भीतीनं त्यांनी नागरिकांवर गोळीबार केल्याचं म्हटलं जात आहे. भारत- नेपाळमधील या सीमाभागाच्या संरक्षणाची जबाबदारी एसएसबीच्या ५१व्या बटालियनच्या खांद्यावर आहे.