मुंबई : अर्थसंकल्पाच्या आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठी आनंदवार्ता मिळाली आहे.
आतंरराष्ट्रीय मुद्रा कोष म्हणजे IMF ने भारतीय अर्थव्यवस्थेवर सकारात्मक विश्वास ठेवला आहे. IMF च्या या वक्तव्यावरून केंद्र सरकारला मोठा पाठिंबा मिळाला आहे. IMF च्या माहितीनुसार, अनेक दिवसांपासून सुस्त झालेली भारतीय अर्थव्यवस्था आता रुळावर येत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. हळू - हळू अर्थव्यवस्था आपल्या मार्गांवर येत आहे त्यामुळे आता भारतीय अर्थव्यवस्था जोर पकडणार आहे. वैश्विक स्तरावर भारत आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यात यशस्वी झाला आहे.
IMF चे डिप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर डेविड लिप्टनने एशियन फायनेंशिअल फोरममध्ये सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्था आता मजबूत होत आहे. सततची गुंतवणूक, वाढती निर्यात आणि सतत कार्यशील असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आशियाच्या बाजाराला चांगला काळ आला आहे.