भारताने दोन नव्हे तर तीन सर्जिकल स्ट्राईक केले, राजनाथ सिंह यांचा दावा

सीमेपलीकडील दहशतवाद्यांवर भारताने केलेल्या कारवाईबाबत राजनाथ सिंह यांनी नवे वक्तव्य करून अनेकांना बुचकळ्यात टाकले आहे. 

Updated: Mar 10, 2019, 03:11 PM IST
भारताने दोन नव्हे तर तीन सर्जिकल स्ट्राईक केले, राजनाथ सिंह यांचा दावा title=

मुंबई : सीमेपलीकडील दहशतवाद्यांवर भारताने केलेल्या कारवाईबाबत राजनाथ सिंह यांनी नवे वक्तव्य करून अनेकांना बुचकळ्यात टाकले आहे. भारताने पाकिस्तानातल्या दहशतवादी तळांवर ५ वर्षात ३ वेळा सीमेपार जाऊन हल्ले चढवल्याचा दावा राजनाथसिंह यांनी केला आहे. पहिल्यांदा उरी दहशतवादी हल्ल्यानंतर केलेले सर्जिकल स्ट्राईक, दुसऱ्यांदा पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुदलाने हवाई हल्ले केले. तर तिसऱ्या हल्ल्याची माहिती मी देणार नाही असं राजनाथ सिंह म्हणालेत.

१४ फेब्रुवारी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांकडून आत्मघातकी हल्ला करण्यात आला होता. यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मद या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर भारतात संतापाचे वातावरण तयार झाले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय वायूदलाने एअर स्ट्राईक करत पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदचा प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त केला होता.