आयकर कसा भरावा? अजूनही गोंधळलेले असाल तर हा सोपा उपाय तुमच्यासाठी...

आयकर विभागानं दिलेल्या माहितीनुसार, एक नवं ई-कॅलक्युलेटर लॉन्च करण्यात आलंय

Updated: Feb 7, 2020, 12:13 PM IST
आयकर कसा भरावा? अजूनही गोंधळलेले असाल तर हा सोपा उपाय तुमच्यासाठी...  title=

मुंबई : आपल्या मिळकतीनुसार आपल्याला किती आयकर भरावा लागेल? हे जाणून घेणं आता तुमच्यासाठी सोपं झालंय. यासाठी आयकर विभागाची वेबसाईट तुमची मदत करणार आहे. आयकर विभागानं सादर केलेलं एक टूल तुमचा गोंधळ क्षणात दूर करणार आहे. त्याद्वारे तुम्ही तुम्हाला भराव्या लागणाऱ्या कराचं आकलन करू शकता. नवी कर पद्धती आणि जुन्या कर पद्धतीमध्ये नागरिकांचा गोंधळ होऊ नये, यासाठी आयकर विभागानं ही नवी सेवा सुरू केलीय. 

आयकर विभागानं दिलेल्या माहितीनुसार, एक नवं ई-कॅलक्युलेटर लॉन्च करण्यात आलंय. या कॅलक्युलेटरच्या मदतीनं कोणतीही व्यक्ती आपली मिळकत आणि बचतीची माहितीच्या आधारे आपल्याला नव्या किंवा जुन्या कर आकारणी पद्धतीनुसार किती कर भरावा लागेल, हे जाणून घेऊ शकेल. उल्लेखनीय म्हणजे, यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी आकारणी केली जाणार नाही. तुम्ही या सेवेसाठी आयकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊ शकता. किंवा इथे क्लिक करा.

https://www.incometaxindiaefiling.gov.in/Tax_Calculator/index.html?lang=eng

आयकर विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक मध्यमवर्गीय लोक आपल्या इन्कम टॅक्स स्लॅब आणि मिळणाऱ्या सूटबद्दल जागरूक नसतात. याशिवाय आयकर दात्यांमध्ये आपल्याला भराव्या लागणाऱ्या टॅक्सबद्दल थोडा संशयही असतो. त्यामुळेच केंद्र सरकारनं सामान्य करत्यांना कराच्या बाबतीत जागरूक करण्यासाठी हे ई - कॅलक्युलेटर लॉन्च केलंय. या कॅलक्युलेटरमध्ये तुम्हाला तुमची मिळकत, संपत्ती आणि गुंतवणुकीची माहिती दिल्यानंतर लगेचच आयकराची माहिती मिळू शकेल.