Horrific Incident : ... म्हणून चार महिन्याच्या बाळाचं मुंडक फावड्याने उडवलं; जन्मदात्या आईनेच लेकराचा जीव घेतला

आईने चार महिन्याच्या बाळाचं(4 month baby boy) मुंडक फावड्याने उडवलं आहे. उत्तर प्रदेशात(Uttar Pradesh) ही थरकाप उडवणारी घटना घडली आहे(Horrific Incident ). या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे(Crime News)

Updated: Jan 8, 2023, 04:27 PM IST
Horrific Incident : ... म्हणून चार महिन्याच्या बाळाचं मुंडक फावड्याने उडवलं; जन्मदात्या आईनेच लेकराचा जीव घेतला title=

Horrific Incident : पोटचं लेकरु म्हणजे आईच्या काळजाचं तुकडा. बाळाला साधं खरचटलं तरी आईच्या काळजाच्या धस्स होतं. जन्मदात्या आईनेच लेकराचा जीव घेतला आहे. आईने चार महिन्याच्या बाळाचं(4 month baby boy) मुंडक फावड्याने उडवलं आहे. उत्तर प्रदेशात(Uttar Pradesh) ही थरकाप उडवणारी घटना घडली आहे(Horrific Incident ). या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे(Crime News)

सुलतानपूर जिल्ह्यातील गोसाईगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनौडीह गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी महिलेचे नाव मंजू देवी असं आहे.  पती शिवकुमार ती  धनौडीह गावात राहते. शिवकुमार हा कानपूरमध्ये मजूर म्हणून काम करतो.  चार महिन्यांपूर्वीच मंजूने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मामुळे शिवकुमार आनंदात होता.  त्याला कल्पनाही नव्हती की त्याची पत्नीच त्याच्या बाळाचा जीव घेईल. 

मंजूने रविवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास आपल्या बाळाचा जीव घेतला.  गावातील काळ्या पुतळ्यासमोर बाळाचं मुंडक फावड्याने उडवून तिने आपल्या चार महिन्यांच्या लेकराचा बळी दिला. मंजू देवी मनोरुग्ण असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. ती अनेकदा चित्र विचित्र कृती करत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. मात्र, यावेळी त्याने तिने चक्का आपल्याच मुलाची हत्या केल्याने ग्रामस्थदेखील भयभित झाले. ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती.

घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मंजू देवीसह बाळाचा मृतदेह ताब्यात घेतला. बाळाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शवागृहात पाठवण्यात आला आहे. ही घटना संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. 
मंजू देवीचे काही तांत्रिकांच्या संपर्कात होती. आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून  तिने एका तांत्रिकाच्या सांगण्यावरूनच आपल्या मुलाचा बळी दिल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासादरम्यान समोर आली आहे.  मंजू देवीला बाळाचा बळी घे असं सांगणारा हा तांत्रिक कोण आहे याचा पोलिस शोध घेत आहेत. पोलीस अधीक्षक सोमेन वर्मा यांनी  याचा तातडीन तपास करण्याचा आदेश दिला आहे. 

ज्याठिकाणी मंजूने बाळाचा बळी दिला तेथे पूजेचे साहित्य आढळून आले आहे. ज्यावेळेस मंजू देवीने बाळाचा बळी दिला त्यावेळेस तिच्यासह तांत्रिक उपस्थित होता का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ग्रामस्थांना बाळाचा मृतदेह घटनास्थळी आढळून आले. यानंतर त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली.