Punjab Crime News : पंजाबमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कंडोममुळे हॉस्टेलच्या बाहेरील नाला तुंबला. नाल्याची साफसफाई करताना हा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. हॉस्टेलमध्ये नेमकं चालायचं काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लुधियानाच्या वॉर्ड क्रमांक 20 मधील हे प्रकरण आहे. येथील संजय गांधी कॉलनीत हे हॉस्टेल आहे. या हॉस्टेल बाहेरील ड्रेनेज लाईन तुंबली होती. याचा त्राश हॉस्टेलच्या आसपास राहणाऱ्या लोकांना होत होता. सफाई कर्माचाऱ्याला बोलवण्यात आले. यावेळी ड्रेनेजचे झाकण उघडले असता स्थानिकांना मोठा धक्का बसला.
हॉस्टेलबाहेरील या नाल्यात कंडोमच्या खच जमा झाला होता. या कंडोममुळेच हा नाला तुंबला होता. मोठ्या प्रमाणात कंडोम या नाल्यात जमा झाले होते. हा प्रकार पाहून स्थानिक अचंबित झाले. नाला साफ केल्यानंतर ड्रेनेज लाईन मोकळी झाली.
कंडोममुळे ड्रेनेज तुंबल्यामुळे स्थानिक संतापले आहेत. या हॉस्टेलमध्ये देह विक्रीचा व्यवसाय चालत असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. रात्री उशीरापर्यंत या हॉस्टेलमध्ये धुमाकूळ सुरु असतो. यामुळे हॉस्टेलच्या आसपासच्या परिसरात राहणाऱ्या महिलांमध्ये असुरक्षिततेची भावान निर्माण झाली आहे. याबाबत वारंवार पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. मात्र, पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. पोलिस हा व्यवसाय करणाऱ्यांना साथ देत असल्याचा गंभीर आरोप आरोप देखील स्थानिकांनी केला आहे. कंडोममुळे नाला तुंबणे हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. यावरुनच या घटनेचे गांभीर्य लक्षात येते. आता तरी पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी स्थानिक करत आहेत.
हॉस्टेल ज्या जागेत ती जागा एका व्यक्तीने भाडे तत्वावर घेतली असून या जागेत त्याने हे हॉस्टेल सुरु केले आहे. अनेक वर्षांपासून येथे हे हॉस्टेल आहे. मात्र, या हॉस्टेमध्ये गैर प्रकार होत असल्याची तक्रार करुनही पोलिसांनी कारवाई केलेली नाही. यामुळे स्थानिक आक्रमक झाले आहेत. तत्काळ हे हॉस्टेल रिकामे करावे अशी मागणी देखील स्थानिक करत आहेत.