नसीरुद्दीन आता बोलतायत ते जीनांनी आधीच म्हटलं होतं- इम्रान खान

 नसीरुद्दीन आपल्या वक्तव्यावर आजही ठाम आहेत. यामध्ये आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी उडी घेतली आहे. 

& Updated: Dec 22, 2018, 11:16 PM IST
नसीरुद्दीन आता बोलतायत ते जीनांनी आधीच म्हटलं होतं- इम्रान खान  title=

नवी दिल्ली : बॉलीवुडचे जेष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी देशातील झुंडबळी आणि आपल्या मुलांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त करणारे विधान केले होते. या विधानावरुन देशभरात तिखट प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.  उत्तर प्रदेश नवनिर्माण सेना प्रमुख अमित जानी यांनी तर नसीरुद्दीन यांच्यासाठी पाकिस्तानचे तिकिट बुक केले आहे. पण नसीरुद्दीन आपल्या वक्तव्यावर आजही ठाम आहेत. यामध्ये आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी उडी घेतली आहे.

नसीरुद्दीन शाहंना 'या' नेत्याकडून पाकिस्तानचे तिकिट

इम्रान खान म्हणतात..

 नसीरुद्दीन शाह यांनी आता जे म्हटलंय ते पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जीना यांनी फार पूर्वीच म्हटलंय असे इम्रान खान यांनी सांगितले. भारतात मुस्लिमांना बरोबरीची वागणूक मिळत नाही हे जिना यांना माहित होतं. त्यामुळे त्यांनी वेगळ्या पाकिस्तानची मागणी केली होती असे स्पष्टीकरणही इम्रान खान यांनी दिले. पाकिस्तानातील एका कार्यक्रमा दरम्यान ते बोलत होते. 

 हिंदू संघटनांच्या विरोधामुळे नसीरुद्दीन शाहांची अजमेर साहित्य संमेलनातून माघार

नसीरुद्दीन ठाम

नसीरुद्दीन शाहंना 'या' नेत्याकडून पाकिस्तानचे तिकिट

या देशात गायीच्या मृत्यूचे महत्त्व पोलिसाच्या मृत्यूपेक्षा जास्त आहे असे वक्तव्य नसीरुद्दीन शाह यांनी केले होते. यानंतर त्यांच्यावर टीकेची मोठी झोड उठली होती. मात्र, नसीरुद्दीन शाह आपल्या भूमिकेवर ठाम राहीले. मी एक भारतीय आहे. या देशाबद्दल मला जे प्रश्न पडले आहेत ते मी उपस्थित केले त्यात माझे काय चुकले की मला गद्दार ठरवले जाते आहे?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या देशात आणखी किती स्वातंत्र्य हवं? असा प्रश्न अभिनेते अनुपम खेर यांनी नसीरुद्दीन शाह यांचे नाव न घेता विचारला.