कॅलिफोर्नियातून बिया आणल्या, घरबसल्या महिन्याला 2 लाखांची कमाई! आता झाली अटक

Cannabis Cultivation In Flat: एका व्यक्तीने घरातच गांजाची लागवड केली. गांजाच्या शेतीतून त्या व्यक्तीने लाखो रुपयांची कमाई केली आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 13, 2024, 12:56 PM IST
कॅलिफोर्नियातून बिया आणल्या, घरबसल्या महिन्याला 2 लाखांची कमाई! आता झाली अटक title=
Imported seeds from california earned 2 lakh monthly cannabis cultivation in flat

Cannabis Cultivation In Flat: ग्रेटर नोएडाच्या एका सोसायटीत धक्कादायक प्रकार घडला आहे. इमारतीतील एका फ्लॅटमध्ये गांजाची शेती करण्यात येत असल्याचे समोर आला आहे. कुंड्यांमध्ये गांजांची लागवड करण्यात येत होती. इतकंच नव्हे तर, गांजाच्या बिया कॅलिफॉर्नियातून मागवण्यात आल्या होत्या. पोलिस आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने जेव्हा घरावर छापेमारी केली तेव्हा हा धक्कादायक खुलासा झाला. मेरठ येथे राहणाऱ्या राहुल चौधरीने आधुनिक एरोपोनिक्स पद्धतीने फ्लॅटमध्येच प्रमियम गांजाची शेती करण्यास सुरुवात केली होती. या अनधिकृत व्यवसायासाठी त्याने डार्क वेबची मदत घेत महिन्याला अडीच लाखांची कमाई करत होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित चौधरी हा मेरठ येथील रहिवाशी आहे. नोएडा येथे तो एका फ्लॅटमध्ये राहत होता. त्याने त्याच फ्लॅटमध्ये आधुनिक पद्धतीची मदत घेत उच्च दर्जाच्या गांजाची शेती करण्यास सुरुवात केली. राहुलने गांजाच्या शेतीसाठी कॅलिफॉर्नियातून उच्च दर्जाची OG गांजाच्या बिया मागवल्या होत्या. या व्यवसायात यश मिळवण्यासाठी त्याने हायटेक एरोपोनिक्स पद्धतीचा वापर केला होता. ज्यात मातीव्यतिरिक्त पाणी, पोषक तत्वे आणि विशेष प्रकारच्या कृत्रिम लाइट्सच्या मदतीने रोपं वाढवता येतात. या संपूर्ण सेटअपची किंमत प्रति रोपटे 5 हजार ते 7 हजार रुपयांपर्यंत होते. मात्र 30 ग्रॅमच्या उप्तादनासाठी राहुलला 60 हजाराहून अधिक किंमत मिळत होती. 

राहुलने त्याचा हा व्यवसाय लपवण्यासाठी पोलिस आणि नारकोटिक्स सेलपासून लपवण्यासाठी डार्ब वेबची मदत घेतली. ते इनक्रिप्टेड मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करुन त्यांच्या ग्राहकांसोबत संपर्क करत होता. ते ग्राहक फक्त तेच लोक होते ज्यांना खास ओजी गांजाची किंमत आणि क्वालिटीबद्दल माहिती होतं. या पद्धतीने राहुल दर महिन्याला अडीच लाख रुपयांपर्यंतची कमाई करत होता. 

राहुलने त्याच्या फ्लॅटमध्ये विविध प्रकारचे लाइट्स आणि उपकरणे लावली होती. जे नैसर्गिकपद्धतीचा सूर्यप्रकाश आणि हवेमुळं वातावरण निर्मित करु शकतात. हे सर्व उपाय रोपांच्या वाढीसाठी अनुकुल होते. संपूर्ण फ्लॅटमध्ये तसे वातावरण नियंत्रणात ठेवले जायचे. एकप्रकारे राहुलने गांजाच्या शेतीची नर्सरीच बनवली होती. 

राहुल चौधरीच्या या संपूर्ण कारस्थानाचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा सोसायटीतील काही लोकांनी त्याच्या फ्लॅटमध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय आला आणि त्यांनी पोलिसांना याबाबत सूचना दिली. पोलिसांनी व नारकोटिक्स सेलच्या छापेमारीत त्यांना 80 गांजाची रोपं आणि 2 किलो हायटेक गांजा जप्त केला. त्याचबरोबर रोपांची लागवड करणारी उपकरणं, पॅकिंग मटेरियल, डिजीटल वजनकाटा, लाइट्स सगळं जप्त केले. आरोपीने खोलीत जवळपास 50 पेक्षा अधिक कुंड्यात गांजाची लागवड केली होती.