नवी दिल्ली : गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी सुरु असलेल्या मतमोजणीत साधारण भाजपच्या दिशेने कल झुकलाय. आतापर्यंतचे कल पाहता गुजरात आणि हिमाचल दोन्ही राज्यांमध्ये भाजपने विजय मिळवलाय.
यातच भाजपच्या या विजयासाठी भाजपच्या जनता युवा मोर्चाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना श्रेय दिलेय. युथ विंगने गुजराच्या विजयाबद्दल सोशल मीडियावर लिहिले की, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीच्या पक्षाचा त्वरित प्रभाव, भाजपने गुजरात आणि हिमाचल दोन्ही राज्यांमध्ये विजय मिळवलाय.
भाजपच्या युथ विंगने आणखी एका ट्विटमध्ये लिहिलंय, विरोधकांनी त्यांना चहावाला म्हटलं, नीच माणूस म्हटलं आणि काही काही नाही म्हटलं. मात्र जनादेशने विकास आणि गुजरातमध्ये झालेल्या कामांना मते मिळालीत. दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलंय, भाजपने सहाव्यांदा सरश विजय मिळवलाय. यावरुन असे दिसून येते की देशात बदलाचा विजय झालाय.
Immediate impact of new Congress President @OfficeOfRG leading the Party @BJP4India wins both Gujarat & Himachal Elections .. #GujaratVerdict
— BJYM (@BJYM) December 18, 2017
The Opposition called him Chaiwala, Neech Aadmi and what not; but popular public-mandate has voted for the development work done in Gujarat #GujaratVerdict
— BJYM (@BJYM) December 18, 2017
BJP's 6th straight victory has reflected the changing winds in India! 'Caste-based' politics and the 60-year tried and tested formula of 'Divide and Rule' will no more work in our Country. #GujaratVerdict
— BJYM (@BJYM) December 18, 2017