काँग्रेसला राहुल गांधींच्या अध्यक्षपदाचा फायदा झाला नाही: रामदास आठवले

गुजरातमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीला कलांमध्ये काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळाली.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 18, 2017, 01:26 PM IST
काँग्रेसला राहुल गांधींच्या अध्यक्षपदाचा फायदा झाला नाही: रामदास आठवले title=

मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकिसाठी झालेल्या मतदानाची मतमोजनी अद्याप सुरू आहे. मात्र, गुजरातची जनता भाजपसोबत असल्याचे पुन्हा एकदा पुढे येत आहे. अशा स्थितीत विवीध राजकीय नेत्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनीही आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

रामदास आठवले यांनी म्हटले आहे की, गुजारत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाचा फायदा झाला नाही. काँग्रेस आणि भाजप यांच्यात अटीतटीचा सामना झाला मात्र, गुजरातची जनता भाजपच्या पाठिमागे ठाम राहिली. गुजरातमध्ये भाजपला विजयी केल्याबद्दल जनतेचे आभार, अशी प्रतिक्रीया मंत्री रामदास आठवले यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

गुजरातमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीला कलांमध्ये काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळाली. मात्र आता कलानुसार भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे.

दरम्यान, ताज्या वृत्तानुसार भाजप सध्या 103 जागांवर आघाडीवर आहे. तर, कॉंग्रेस 73 जागांवर आघाडीवर आहे. इतर पक्ष 3 जागांवर अगाडीवर आहेत. दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी प्रचंड पिछाडीवर आहेत. जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर हेही जोरदार आघाडीवर आहेत. त्यामुळे गुजरातमधले राजकीय चित्र प्रचंड बदलताना दिसत आहे. गुजरातमध्ये भाजपचा पराभव झाला किंवा अल्पमतात सत्ता आली तरी, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यासाठी तो प्रचंड मोठा धक्का असणार आहे. दरम्यान, निवडणुकीचे कल क्षणाक्षणाला बदलत आहेत अद्याप कोणतेही चित्र स्पष्ट झाले नाही.

कडेकोट पोलीस बंदोबस्तात 33 जिल्ह्यांमध्ये मतमोजणीला सुरूवात झाली आहे. ही मतमोजणी एकूण 37 केंद्रांवर सुरू आहे. गुजरातमध्ये झालेल्या 182 जागांसाठी 68.41 टक्के मतदान झाले होते. उत्तर गुजरातमध्ये 32 जागा आहेत. दक्षिण गुजरातमध्ये 35, सौराष्ट्र 54 आणि मध्य गुजरातमध्ये 91 जागा आहेत.