यंदाचा हिवाळा नावापुरताच? उकाड्याशी दोन हात करण्यासाठी सज्ज व्हा, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Weather Updates : मंगळवारी राज्याच्या विविध भागांमध्ये पावसानं हजेरी लावली. पण, परतीच्या या पावसामुळं तापमानवाढही नोंदवली गेली.   

सायली पाटील | Updated: Oct 18, 2023, 09:03 AM IST
यंदाचा हिवाळा नावापुरताच? उकाड्याशी दोन हात करण्यासाठी सज्ज व्हा, हवामान विभागाचा इशारा  title=
(छाया सौजन्य - रॉयटर्स)/ IMD Maharashtra Weather Prediction winters to take over soon latest news

Maharashtra Weather Updates : अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळसदृश परिस्थितीमुळं देशातील हवामानातही काही बदल झाले. ज्यामुळं समुद्रकिनारपट्टी भागामध्ये पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली. तिथं उत्तर भारतात काही ठिकाणी गापरपीट झाली. तर, अतीव उत्तरेकडील राज्यांकडे मात्र थंडाचा कडाका वाढताना दिसला. महाराष्ट्रात मात्र ऑक्टोबरस हिटचं प्रमाण आणखी वाढतानाच दिसलं. 

प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या अल निनोच्या स्थितीची तीव्रता दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे यंदाचा हिवाळाही उकाड्यातच जाणार असून, उन्हाळ्यात प्रमाणाहून जास्त तापमान असेल असा अंदाज जागतिक स्तरावरील हवामान संस्थांनी दिला आहे. पावसाळ्याच्या ऋतूवरही अल निनोचा परिणाम दिसून येण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. थोडक्यात राज्यातील निवडक भागांमध्ये थंडीची चाहूल लागली असली तरीही दुपारच्या वेळी मात्र उन्हाचा तडाखा सोसावा लागणार हे मात्र नाकारता येत नाही. 

अस निनोची स्थिती पुढच्या वर्षातही कायम राहून प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील तापमान सरासरीहून 1.5 अंशांनी वाढण्याचा अंदाज आहे.  सुपर अल निनोची स्थिती निर्माण झाल्यास पृथ्वीच्या उत्तर गोलार्धावर त्याचे विपरीत परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. भारतात हे वारे दाखल झाल्यास सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची असण्यासोबतच तापमान वाढही नाकारता येत नाही. 

 

देशाच्या पर्वतीय भागांमध्ये कडाक्याची थंडी पडणार... 

IMD च्या वृत्तानुसार पुढील दोन दिवसांसाठी उत्तर पश्चिम भारतात पुढील दोन दिवस पावसाची हजेरी असेल. यामुळं उत्तरेकडील राज्यांमध्ये हवामान बदलणार आहे. हिमाचलमध्ये मैदानी क्षेत्रांत पावसाची रिमझिम पाहायला मिळेल तर याच राज्याच्या पर्वतीय क्षेत्रासह उत्तराखंड, जम्मू काश्मीर, लडाख आणि सिक्कीम, अरुणाचल प्रदेशमध्ये मात्र थंडीचा कडाका वाढताना दिसेल. एकंदरच देशातील उत्तरेकडच्या राज्यांमध्ये थंडीचा कडाका असताना महाराष्ट्र आणि केरळासह दक्षिणेकडील राज्यांमध्ये मात्र उन्हाच्या झळा आणखी तीव्र होताना दिसणार आहेत. 

हेसुद्धा वाचा : सरकारी कर्मचारी मालामाल; Diwali Bonus म्हणून खात्यात येणार मोठी रक्कम 

 

हिमाचल प्रदेशातही हिमवृष्टी... 

हिमाचल प्रदेशातील शिमला येथे असणाऱ्या नारकंडा आणि खडा पत्थर या भागांमध्ये मोसमातील पहिली बर्फवृष्टी झाली. मंडी, शिमला, कुल्लू, चंबा यांसारख्या क्षेत्रांमध्येही तापमान 5 अंशांवर पोहोचलं. काही भागांमध्ये हा आकडा 5 अंशांच्याही खाली आला. तर, लाहौल आणि स्पिती खोऱ्यामध्ये किमान तापमानाचा आकडा 0.7 अंशांपर्यंत पोहोचला होता. 

हवामान विभागाच्या माहितीनुसार उत्तरेकडे थंडीची लाट आलेली असतानाच दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि लक्षद्वीप पट्ट्यामध्ये पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार होताना दिसत आहे. त्यामुळं या आठवड्याअखेरीस देशाच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.