आयआयटी प्रवेश परीक्षा पुढल्या वर्षापासून ऑनलाईन

आयआयटी प्रवेश परीक्षा पुढल्या वर्षापासून ऑनलाईन घेतली जाणार आहे. 

Updated: Aug 21, 2017, 03:32 PM IST
आयआयटी प्रवेश परीक्षा पुढल्या वर्षापासून ऑनलाईन title=

नवी दिल्ली : देशातल्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षांपैकी एक अशी ओळख असलेली, आयआयटी प्रवेश परीक्षा पुढल्या वर्षापासून ऑनलाईन घेतली जाणार आहे. 

आय आय टी प्रवेशांबाबत धोरण निश्चिती करणा-या संयुक्त प्रवेश मंडळानं चेन्नईमध्ये बोलावलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. आय आय टी प्रवेशासाठी घेतली जाणारी जे ई ई ऍडव्हान्स परीक्षा ऑनलाईन घेण्याचा विचार गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत होता. मात्र त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा असणं गरजेचं आहे. 

मनुष्यबळ विकास मंत्रालयानं या आधीच जे ई ई ची मुख्य परीक्षा ऑनलाईन घेण्याचा पर्याय मांडला होता. देशभरातल्या इंजिनिअरींग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जे ई ई परीक्षा घेतली जाते. त्या आधारे आय आय टी आणि एन आय टी मध्ये प्रवेश दिला जातो. पेपराची मूल्यमापन प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी जे ई ई ऍडव्हान्स परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे.