मुंबई : चहा हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांचं आवडतं पेय आहे. बरेच लोकं सकाळी उठल्या उठल्या चहा पितात आणि दिवसाची सुरुवात चहाच्या घोटाने करतात. तुमची ही सवय झाली असली, तरी तुम्हाला ही सवय बदलावी लागेल, कारण ही सवय तुम्हाला हानिकारक ठरू शकते. तसेच, तुमच्या या सवयीचा तुमच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. जर तुम्हीही सकाळी उठल्याबरोबर चहा पित असाल, तर तुम्ही आधी ही बातमी वाचा. अनेक तज्ज्ञ असे करण्याला एक वाईट सवय मानतात.
अशा परिस्थितीत, आज आपण वेगवेगळ्या रिपोर्टमध्ये सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याचे काय तोटे आहेत हे जाणून घेत आहोत. चहा पिताना कोणत्या वेळी चहा प्यावा आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे देखील जाणून घ्या.
जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर गरम चहा पित असाल, तर त्याचा परिणाम तुमच्या चयापचय प्रणालीवर होतो, कारण चहामधील असंतुलन आम्लपित्याचा पोटावर खूप परिणाम होतो, ते तुमच्या चयापचय क्रियाकलापांवर परिणाम करते आणि तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
अनेक अहवालांमध्ये असे म्हटले गेले आहे की, चहा आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करतो. असे होते की, जेव्हा आपण रात्री झोपतो आणि सकाळी 8-9 तासनंतर उठतो तेव्हा आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. परंतु जेव्हा तुम्ही पाणी न पिता चहा पिता तेव्हा ते शरीराला जास्त डिहायड्रेट करते, त्यामुळे तुमचे शरीर डिहायड्रेट होणार नाही याची काळजी घ्या.
तसेच, जे रिकाम्या पोटी चहा पितात त्यांना अल्सर आणि हायपरसिडिटीचा धोका असतो. कारण रिकाम्या पोटी गरम चहा पिल्याने पोटाच्या आतील पृष्ठभागाला इजा होण्याचा धोका वाढतो. याशिवाय अॅसिडीटी आणि कब्ज, गॅसची समस्या होते. शक्य असल्यास, दुधाच्या चहा व्यतिरिक्त, सकाळी आपण ग्रीन टी इत्यादींचे सेवन करावे.
याशिवाय रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने स्केलेटल फ्लोरोसिस नावाचा आजारही होऊ शकतो. हा रोग हाडे आत पोकळ करतो. या आजारात शरीरात संधिवात सारखा त्रास होतो.