मुंबई : जर तुम्ही गाडी घेऊन निघालात आणि Driving License सोबत घेण्यास विसरला असाल तर वाहतूक पोलीस तुमच्याकडून दंड वसूल करतात. गाडी चालवताना Driving License सोबत असणे गरजेचे असते. त्यामुळे तुम्ही लायसंन्स जरी विसरलात तरी स्मार्टफोनच्या मदतीने दंड वसुलीपासून तुमची सूटका होऊ शकते. अशी ट्रिक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
ड्रायविंग लायसंन्स सोबत ठेवण्याऐवजी तुम्ही DigiLocker किंवा mParivahan ऍपच्या मदतीने सॉफ्ट कॉपी फोनमध्ये सेव करू शकता. ही सॉफ्ट कॉपी वाहतूक पोलिसांना दाखवल्यास दंड वसूलीसाठी पावती करण्यात येणार नाही. केंद्रीय परिवहन मंत्रालय वर्ष 2018 मध्ये एका एडवायजरीत स्पष्ट करण्यात आले आहे की, DigiLocker किंवा mParivahan ऍपमधूनही ड्रायविंग लायसंन्स गरज पडल्यास दाखवता येईल.
डिजिलॉकरवर अकॉउंट बनवा
सर्वात आधी DigiLockerवर आपले अकॉउंट बनवा. अकॉउंट बनवण्यासाठी आपल्या फोननंबर आणि आधार कार्डची गरज असते. त्यानंतर DigiLockerच्या ऍपवर जाऊन 6 अंकी पिन आणि युजरनेम प्रविष्ठ करून साइन इन करा. नोंदणी असलेल्या फोन नंबरवर OTP येईल. हा पासवर्ड टाकून तुम्ही DigiLocker मध्ये पोहचू शकता. जेथे सर्च बारमध्ये जाऊन ड्रायविंग लायसंन्स चेक करा.
ड्रायविंग लायसंन्स वर क्लिक करून तुमच्या राज्याचे नाव टाका. पुढील माहिती प्रविष्ठ करून Get Document बटनावर क्लिक करा.
ड्रायविंग लायसंन्सच्या सॉफ्ट कॉपीला डाऊनलोड करा.
तुमच्यासमोर डिजिलॉकरमध्ये सॉफ्ट कॉपी ओपन झाल्याने तुम्ही कॉपी डाऊनलोड करू शकता. ही कॉपी तुमच्या फोन मध्ये सेव होईल. असे केल्याने दररोज ड्रायविंग लायसंन्स सोबत बाळगण्याची गरज राहणार नाही. तसेच चोरी झाल्यास, हरवल्यासही चिंता करण्याची गरज राहणार नाही.