तुम्हाला दिवाळीत कसं घर सजवावे असा प्रश्न पडत असेल तर तुमच्यासाठी खास टिप्स...

आज आम्ही तुम्हाला वेस्ट टेप रोल पासून कसे दिवे तयार करायचे हे सांगणार आहोत. 

Updated: Oct 18, 2022, 03:02 PM IST
तुम्हाला दिवाळीत कसं घर सजवावे असा प्रश्न पडत असेल तर तुमच्यासाठी खास टिप्स... title=
If you are wondering how to decorate your home on Diwali special tips for you nz

Diwali 2022 : ऑक्टोबर या महिन्याला सणांचा महिना म्हणून ओळखले जाते. दसरा, दिवाळी आणि भाऊबीज यासारखे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.  तुम्हाला माहितच असेल की दिवाळी ही फक्त 6 दिवसांवर  आहे. दिवाळी म्हटंले की घराची साफसफाई, फराळ आणि पाहूणचार हे सगळं येतं. पण घराची सजावट करताना सगळ्यात जास्त नाकीनौऊ येते. दिवाळीत लोक मातीचे दिवे, चायनीज दिवे आणि मेणबत्त्यांचा वापर करुन घराची सजावट करतात. काही लोक तर या सगळ्या गोष्टी बाजारातून विकत आणतात तर काही लोक टाकाऊ पदार्थांपासून या गोष्टी बनवतात. आज आम्ही तुम्हाला वेस्ट टेप रोल पासून कसे दिवे तयार करायचे हे सांगणार आहोत. (If you are wondering how to decorate your home on Diwali special tips for you nz)

आणखी वाचा - Digital Banking नेमकं आहे तरी काय?  पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन 

 

 

दिवा तयार करण्याची पद्धत जाणून घेऊ -

आपण अनेकदा टेपचा वापर केल्यानंतर तो रोल फेकून देतो. पण तुम्हाला माहित आहे का? तुम्ही त्या रोलचा वापर दिवा तयार करण्यासाठी वापरू शकता.

तुम्हाला हा दिवा तयार करण्यासाठी टेप रोल, गोल्डन कार्ड पेपर आणि गम पाहिजे. तुम्हाला आतून रोलवर गोल्ड कार्ड पेपर चिकटवावा लागेल. त्यानंतर व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोल कार्ड पेपर कापून त्याच्या बेसवर चिकटवावा लागतो. यानंतर, तुम्हाला सोनेरी कागदाची पाने बनवावी लागतील आणि त्यांना स्टेपल करावे लागेल. 

नंतर गोंदाच्या मदतीने, त्यांना वेस्ट रोलभोवती चिकटवा. आता तुम्ही तुमच्यानुसार घराचा कोणताही कोपरा सुंदरपणे सजवू शकता. तुमच्या या कलेची सर्वांकडून कौतूक केले जाईल. 

आणखी वाचा - अंड्याचा वापर करुन तुम्ही वाढवू शकता लांब केस... जाणून घ्या 

 

 

या वर्षी दिवाळी 24 ऑक्टोबरला आहे. तुम्ही या पद्धतीचा वापर करुन दिवा तयार करु शकता.