IDFC फर्स्ट बॅंकेत बंपर भरती, मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

IDFC FIRST Bank job: आयडीएफसी फर्स्ट बॅंकेत असिस्टंट कस्टमर सर्व्हिस मॅनेजर पदाची भरती केली जाणार आहे.

Pravin Dabholkar | Updated: Apr 1, 2024, 06:12 PM IST
IDFC फर्स्ट बॅंकेत बंपर भरती, मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी title=
IDFC FIRST Bank job

IDFC FIRST Bank job: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. मुंबईत तुम्हाला चांगल्या पगाराची संधी मिळणार आहे. आयडीएफसी फर्स्ट बॅंकेत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. 

आयडीएफसी फर्स्ट बॅंकेत असिस्टंट कस्टमर सर्व्हिस मॅनेजर पदाची भरती केली जाणार आहे. या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना ब्रांच मॅनेजिंग ऑपरेशनसाठी रिटेल  बॅंकींग व्यवसाय संभाळावा लागणार आहे. आयडीएफससी फर्स्ट बॅंक शाखेतील नेहमीचे व्यवहार आणि व्यवस्थापकीय जबाबदारी संभाळावी लागेल. बॅंकेची पॉलिसी आणि प्रोसिजरचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. ग्रामीण भागातील डेजिग्रेटेड ब्रांचच्या ग्राहकांना ब्रांच ऑपरेशन आणि सर्व्हिस द्यावी लागणार आहे. 

आलेल्या अर्जाची डेटा एन्ट्री करणे, ग्राहकांचे आयडी आणि अकाऊंट्स बनवणे, केवायसी तपासणे, अर्जाचे फॉर्म आणि लोन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तपासणे, कॅश हॅंडलिंग आणि ट्रान्झाक्शन क्लियरिंग, बॅंकेचे चांगले ऑडीट रेटींग बनवून ठेवणे, बॅंकेच्या अंतर्गत आणि बाह्य ग्राहकांना योग्य सुविधा मिळतील यासाठी काम करणे, अशी जबाबदारी असिस्टंट कस्टमर सर्व्हिस मॅनेजरला पार पाडावी लागेल. 

पदवीधरांना रेल्वेमध्ये नोकरीची संधी, परीक्षेची अट नाही

शिक्षण आणि अनुभव

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. तसेच त्याला संबंधित कामाचा 2 वर्षांचा अनुभव असावा. असे असले तरी फ्रेशर्सदेखील या पदांसाठी अर्ज करु शकतात. 

पगार

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला पद आणि अनुभवानुसार दरमहा 17 हजार ते 60 हजारपर्यंत पगार मिळू शकतो. आयडीएफसी फर्स्ट बॅंकेच्या महाराष्ट्रातील शाखांमध्ये ही भरती होईल. यासाठी अर्जाची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

रेल्वेत तब्बल 9144 जागांवर भरती, दहावी उत्तीर्णांनी 'येथे' पाठवा अर्ज