मला कर्जबुडव्यांचा पोस्टर बॉय केलं, माल्ल्याच्या उलट्या बोंबा

9 हजार कोटींचं कर्ज बुडवून परागंदा झालेल्या विजय मल्ल्यानं वेगळाच कांगावा सुरू केलाय. 

Updated: Jun 26, 2018, 04:53 PM IST
मला कर्जबुडव्यांचा पोस्टर बॉय केलं, माल्ल्याच्या उलट्या बोंबा title=

मुंबई : 9 हजार कोटींचं कर्ज बुडवून परागंदा झालेल्या विजय मल्ल्यानं वेगळाच कांगावा सुरू केलाय. आपल्याला कर्जबुडव्यांचा "पोस्टर बॉय" बनवून टाकल्याचा त्याचा आरोप आहे. ब्रिटनमधल्या एका प्रसिध्द नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यानं हे आरोप केलेत. बॅकेच्या कर्जाची परतफेड करण्याचा आपण प्रयत्न केल्याचा दावाही मल्ल्यानं केलाय. माझं नाव घेताच लोकं भडकतात... हे सर्व राजकीय हेतूनं जाणूनबूजून केलं जात असल्याच्या उलट्या बोंबाही मल्ल्यानं मारल्यात. 9 हजार कोटी रुपये द्यायची आपली तयारी आहे. तसंच सरकारी बँकांना पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं माल्ल्या म्हणाला आहे.

15 एप्रिल 2015 साली मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तेव्हाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहीलं होतं. पण त्यांच्याकडून आपल्याला कोणतंही उत्तर मिळालं नसल्याचा दावा माल्ल्यानं केला आहे. सीबीआय आणि ईडीनं मला अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. राजकीय हेतूनं मला अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप माल्ल्यानं केला आहे.