Video : झोपलेल्या पत्नीला भुतानं पछाडलं? तिला हवेत तरंगताना पाहून पतीनं काढला पळ

झोपलेल्या पत्नीला भुतानं पछाडलं? कोणा चित्रपटातील दृश्य नाही प्रत्यक्षात घडलेल्या घटनेनं सगळेच हैराण. Video तुफान Viral

Updated: Nov 18, 2022, 03:12 PM IST
Video : झोपलेल्या पत्नीला भुतानं पछाडलं? तिला हवेत तरंगताना पाहून पतीनं काढला पळ  title=
husband wife Viral Video as she suddenly started floting he left shocked

Husband Wife Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी, नव्हे तर दर मिनिटाला काही व्हिडीओ (Video) , Reels आणि Shorts Viral होत असतात. यातले काही व्हिडीओ निरर्थक, काही भावनिक, काही विनोदी तर काही विचार करायला भाग पाडणारे असतात. काही व्हिडीओंच्या माध्यमातून अफलातून अशी माहितीसुद्धा पुरवली जाते. जगाच्या कुठल्या कोपऱ्यावर नेमकं काय सुरुये हे सर्वकाही या व्हिडीओंच्या माध्यमातून पाहायला मिळतं. हे Video पुराण इथेच थांबत नाहीये, कारण एक असं रील सध्या गाजतंय जे पाहून तुम्हालाही धक्काच बसेल. हे कसं शक्यंय? हाच प्रश्न तुम्ही विचाराल. 

nishantaroraofficial या युजरनं त्याच्या इन्स्टाग्राम (instagram) अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. पाहताक्षणी ती दृश्य Bedroom मधील असल्याचं लक्षात येत आहे. यामध्ये पती बेडवर झोपलेला असतानाच एकाएकी त्याची पत्नी पाण्याची स्टीलची रिकामी टाकी घेऊन येते. 

खरी गंमत तर, पुढे.... 

पत्नी, ती रिकामी टाकी बेडवर ठेवते आणि त्यावर अशा पद्धतीने झोपते की ती दिसणारच नाही. अंगावर चादर घेतल्यामुळे पत्नी / महिला टाकीचा आधार घेत झोपली आहे हे लक्षातही येत नाही. तिला असं अधांतरी पाहून, या विचित्र प्रकारानं पतीला धडकी भरते आणि याच धक्क्यानं तो बेडवरून ताडकन उठतो. (Prank Video)

हेसुद्धा पाहा : Girls Fight Video: आधी धक्काबुक्की आणि मग लाथा-बुक्के, क्लासरुममध्ये मुलींची Free Style Fighting

पत्नीसोबत नेमकं काय घडतंय या विचारानं मनात घर करण्यापूर्वीच तो तिथून पळ काढतो. त्याची ही अवस्था पाहून पत्नीला हसू आवरत नाही आणि ती हा Prank तिथेच थांबवत टाकीवरून हळूच पडते. व्हिडीओमध्ये दिसणारी ही दृश्य पाहून सध्या नेटकऱ्यांमध्येही एकच हशा पिकत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला/ Reel ला 398,242 likes मिळाले आहेत. काहींनी तो स्टेटसमध्ये शेअर करत आपआपल्या पत्नींनाही टॅग केलं आहे. 

पती- पत्नीच्या नात्याचा हा पछाडलेला व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला?