कोणाचं काय तर कोणाचं काय.... 'मॅडम ये नाहती नही...' म्हणत नवऱ्यानं मागितला घटस्फोट

त्यांच्या घरातील लोकांना अशी आशा होती की, मुलाच्या जन्मानंतर दोघांमधील भांडण संपतील पण...

Updated: Sep 22, 2021, 07:36 PM IST
कोणाचं काय तर कोणाचं काय.... 'मॅडम ये नाहती नही...' म्हणत नवऱ्यानं मागितला घटस्फोट title=

अलीगढ : नवरा-बायकोचं नातं हे, 'तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना' असं असतं. प्रत्येक नवरा-बायकोमध्ये या ना त्या कारणावरुन भांडणं ही होतच असतात. परंतु त्यामुळे त्यांच्यातील प्रेम संपत नाही. हे दोघेजण जितके एकमेकांसोबत भांडतात तितकेच ते एकमेकांवर प्रेम देखील करतात. एकमेकांशिवाय त्यांना करमतही नाही. परंतु असे की काही जोडपी असतात, ज्यांच्यामधील भांडणं इतकी टोकाची होतात की, त्यांचं हे भांडण अगदी घटस्फोटापर्यंत पोहोचतो.

नवरा-बायकोमधील घटस्फोटाची कारणे ही वेगवेगळी असू शकतात. काही वेळा ही कारण खरोखरंच खूप मोठी असतात, तर काही कारणं ही इतकी शुल्लक असतात की, ती ऐकून एखाद्याला त्यावर हसू येईल. परंतु ते शुल्लक कारण त्या जोडप्यासाठी मोठं ठरु शकतो.

अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधील अलीगढमध्ये घडली. इथे आपली बायको दररोज अंघोळ करत नाही म्हणून एका नवऱ्याला आपल्या बायकोकडून घटस्फोट हवा आहे. हो तुम्ही बरोबर वाचलात. बायको अंघोळ करत नाही म्हणून या जोडप्यामधील भांडण घटस्फोटापर्यंत पोहोचलं आहे. हे कारण हस्यास्पद असलं तरी, ते या जोडप्यासाठी एक गंभीक विषय बनला आहे.

आता ही बाब शहरातील महिला संरक्षण कक्षापर्यंत पोहोचली आहे. आता जोडप्याचे काउन्सिलिंग केले जात आहे. जेणेकरून दोघेही आपले मतभेद विसरून एकत्र राहण्यास तयार होतील.

खरंतर नवऱ्याने, काउन्सिलिंगदरम्यानच आपल्या पत्नीपासून घटस्फोटाची विनंती करताना, ती दररोज अंघोळ करत नसल्याचे मुख्य कारण पुढे केले आहे.

पतीने काउन्सिलरला सांगितले, 'मॅडम, माझी पत्नी आंघोळ करत नाही, म्हणून मी तिच्या सोबत राहू शकत नाही. कृपया मला घटस्फोट द्या.' नवऱ्याची अशी विचित्र कंप्लेंट ऐकून आश्चर्यचकित झाले. प्रकरण अलीगढच्या चांदौस भागातील आहे. असे सांगितले जात आहे की, या जोडप्याचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले.

नवरा-बायके एकमेकांच्या सवयीमुळे त्रस्त

या जोडप्यामध्ये लग्नानंतर, सुरुवातीला सर्वकाही ठीक झाले, परंतु काही काळानंतर, यांच्यामध्ये भांडणे सुरू झाली. भांडणे इतकी वाढली की, दोघांनाही एकमेकांच्या सवयी आणि राहणीमानाचा त्रास होऊ लागला आहे. दरम्यान, नऊ महिन्यांपूर्वी या दोघांना एक मुलगा देखील झाला आहे.

त्यांच्या घरातील लोकांना अशी आशा होती की, मुलाच्या जन्मानंतर दोघांमधील भांडण संपतील, पण दोघांमधील भांडण थांबलेच नाही. जेव्हा दोघांमधील भांडण मर्यादेपलीकडे वाढले तेव्हा प्रकरण पोलीस आणि महिला संरक्षण कक्षापर्यंत पोहोचले.

काउन्सिलरने नवरा आणि बायको दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु हे दोघेही एकमेकांवरती आरोप लावत होते. पती म्हणाला की, तो आपल्या बायकोवर नाराज आहे कारण ती दररोज आंघोळ करत नाही. ज्यामुळे तिच्या शरीराला दुर्गंध येतो. तर बायकोच्या वतीने आरोप करण्यात आला आहे की, तिला निराधार गोष्टींच्या आधारे त्रास दिला जात आहे.

काउन्सिलरकडून या दोघांचं नातं वाचवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न सुरू आहे. परंतु हे नातं वाचवायचं की, नाही हे या नवरो-बायकोच्या हातात आहे.