Makar Sankranti 2023 : परफेक्ट तिळगुळ बनवण्याची झटपट आणि सोपी रेसिपी...लाडू कडकसुद्धा होणार नाहीत.

गूळ व्यवस्थित वितळल्यावर त्यात  तीळ ,गुलाबाच्या पाकळ्या घाला आणि ढवळून घ्या, मिश्रण थोडं गार झाल्यावर  लाडू वळून घ्या,

Updated: Jan 9, 2023, 01:21 PM IST
Makar Sankranti 2023 : परफेक्ट तिळगुळ बनवण्याची झटपट आणि सोपी रेसिपी...लाडू कडकसुद्धा होणार नाहीत.  title=

Makar Sankranti Tilgul Laddu Recipe:  तिळाचे लाडू आपल्याला सर्वानाच आवडतात. एक लाडू काहून काही केल्या पोट भरत नाही मग एक -दोन -तीन असे कितीचं लाडू आपण फस्त करून टाकतो. बच्चे कंपनीला तर मकर संक्रांत (Makar Sankranti 2023) म्हटली की, दोन गोष्टी फार आवडतात एक म्हणजे पतंग (kite nylone manja incidentsin makar sankranti 2023) आणि दुसरे म्हणजे तिळगुळाचे लाडू. (tilgul recipe in marathi) 
तीळ आणि गूळ एकत्र करून बनवलेले लाडू म्हणजे तिळगुळाचे लाडू. आजकाल बाजारात तिळगुळाचे लाडू सहज उपलब्ध असतात, पण घरी बनवलेल्या लाडवांची चव विकतच्या लाडवांना कुठून येणार? म्हणून आपल्या घरीच लाडू बनवले जातात. (how to make tilgul at home makar sankranti 2023 recipe in marathi ) पण बऱ्याचदा घरी लाडवांचा बेत कधी कधी फसू शकतो आणि त्याला निमित्त असतं, गुळाचा पाक. पाक व्यवस्थित तयार झाला की लाडू व्यवस्थित बांधले जातात. गुळाचा पाक फसला की लाडवांचा बेतही फसला हे समजून जा. 

अगदी परफेक्ट तिळाचे लाडू कसे बनवायचे तेही अर्ध्या तासात चला तर मग जाणून घेऊया सोपी आणि झटपट रेसिपी. (Healthy immunity booster til laddu recipe)

तिळाचे लाडू कसे बनवायचे (How to make perfect til laddu)

  • गॅसवर एक पण ठेवा तो व्यवस्थित गरम होऊ द्या, आता त्यात तीळ घाला आणि ते छान खरपूस भाजून घ्या. 
  • भाजलेले तीळ बाजूला काढून घ्या आता पॅनमध्ये थोडंसं पाणी घाला, आणि त्यात गूळ घालून तो मंद आचेवर वितळेपर्यंत शिजवून घ्या.  
  •  गूळ व्यवस्थित वितळल्यावर त्यात  तीळ ,गुलाबाच्या पाकळ्या घाला आणि ढवळून घ्या, मिश्रण थोडं गार झाल्यावर लाडू वळून घ्या,
  • लाडू वळताना एक लक्षात ठेवा हाताला थोडं तेल लावा , हाताला चटका लागणार नाही याकडे लक्ष द्या. 
  •  यात तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाणे घालू शकता. (How to Make Til Laddo at Home Makar Sankrant 2023 Special Recipe Marathi Cooking Tips)

चला तर मग या संक्रांतीला अगदी परफेक्ट तिळाचे लाडू बनवा आणि इतरांनाही तुमचे लाडू एवढे मस्त कसे झालेत याची रेसिपी सांगूनच टाका.  (how to make tilgul at home makar sankranti 2023 recipe in marathi )