सेकंड हँड कार खरेदी करण्यासाठी मिळतं कर्ज, कसं ते जाणून घ्या

कधी कधी सेकंड हँड गाडी खरेदी करणंही परवडत नाही. त्यामुळे एखाद्या बँकेकडून कर्ज मिळालं तर बरं होईल, अशी अनेकांची भावना असते. तुमची ही इच्छा काही बँका पूर्ण करतील.

Updated: Jul 27, 2022, 01:45 PM IST
सेकंड हँड कार खरेदी करण्यासाठी मिळतं कर्ज, कसं ते जाणून घ्या title=

Second Hand Car Loan: गाड्यांच्या किमती पाहता प्रत्येकाला परवडेल असं होत नाही. त्यामुळे अनेक जण सेकंड हँड गाडी खरेदीवर समाधान मानतात. पण कधी कधी सेकंड हँड गाडी खरेदी करणंही परवडत नाही. त्यामुळे एखाद्या बँकेकडून कर्ज मिळालं तर बरं होईल, अशी अनेकांची भावना असते. तुमची ही इच्छा काही बँका पूर्ण करतील. काही बँका सेकंड कार खरेदी करण्यासाठी कर्ज देतात. पण नवी गाडी खरेदी करणाच्या तुलनेत सेकंड हँड कारसाठी जास्त व्याज मोजावं लागतं. सेकंड हँड कारवर 9.25 ते 16 टक्के व्याज भरावं लागतं. व्याज दर क्रेडिट स्कोरवर निश्चित केलं जातं.

हे कर्ज स्वत:चा व्यवसाय आणि सॅलरी होल्डर कर्मचाऱ्यांना मिळतं. नोकरी करत असाल तर तुमचं वय 21 ते 65 वर्षांदरम्यान असायला हवं. तसेच सध्याच्या कंपनीत कमीत कमी एक वर्ष नोकरी करणं गरजेचं आहे. दुसरीकडे स्वत:चा व्यवसाय असल्यास तुमचं वय 25 ते 65 दरम्यान असलं पाहीजे. तसेच महिन्याचं उत्पन्न 15 हजार असायला हवं. काही बँका सेकंड हँड कारची डिप्रेशियन किंमत पाहून कर्ज देतात. त्याचबरोबर कर्ज फेडण्यासाठी काही पर्याय देखील दिले जातात. 

अर्ज करण्यापूर्वी या बाबी लक्षात घेणं गरजेचं

कर्ज घेण्यासाठी सोपी पद्धत असून थेट ऑनलाईन किंवा ब्रांचमध्ये जाऊन अप्लाय करू शकता. पण हे लक्षात ठेवा की, काही बँका तीन वर्ष जुन्या गाडीवर कर्ज देत नाही. त्याचबरोबर सेकंड हँड कार इंश्युरन्स कास्ट लोन अमाउंटमध्ये सहभागी तर नाही, याची माहिती घ्या. सेकंड हँड कार कर्ज घेण्यासाठी अप्लिकेशन फॉर्म, पासपोर्ट साइज फोटो, कार मूल्यांकन रिपोर्ट, आयडेंटिटी प्रूफ, इनकम प्रूफ या बाबी आवश्यक आहेत.