गुगलमधून तुम्हीही कमवा लाखो, करा फक्त एवढच

जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलमधून तुम्ही दरमहा लाखो रुपये कमवू शकता. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 12, 2017, 02:57 PM IST
गुगलमधून तुम्हीही कमवा लाखो, करा फक्त एवढच title=

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलमधून तुम्ही दरमहा लाखो रुपये कमवू शकता. देशभरात आणि जगभरातील कोट्यवधी लोक गुगलच्या माध्यमातून चांगले पैसे कमावत आहेत. आपण कमावलेली रक्कम गुगलकडून डॉलरच्या स्वरूपात दिली जाते.

वाढत्या डिजिटलायजेशनमुळे लोकांसमोर कमाईते भरपूर पर्याय आहेत. यासाठी आपण गुगलद्वारे आपण आपली कमाई कशी वाढवू शकता हे जाणून घेणे आवश्यक आहे.
गुगल अॅडसेन्सही गुगलची एक कंपनी आहे. यामाध्यमातून गुगल जाहिरातीचे व्यवस्थापन करते. ही कंपनी म्हणजे जगभरात सर्वात मोठा आणि सर्वात जास्त पैसे देणारी जाहिरात नेटवर्क आहे. गुगल तुमच्या कामावर जाहिरात देते. या कामातून बरेच लोक लाखो रुपये कमवत आहेत. गुगल अॅडसेन्स हे युट्यूब, ब्लॉग, वेबसाइटवर जाहिराती आणण्यासाठी कार्य करते. तु्म्ही बनविलेला व्हिडिओ किंवा आर्टिकलवर यूजर्सची संख्या जसजशी वाढते त्याप्रमाणे तुमच्या पातळी देखील वाढते.

हे करावे लागेल

जर तुम्ही गुगल अॅडसेन्सद्वारे कमवू इच्छित असल्यास, आपण प्रथम आपला जीमेल आयडी तयार करणे आवश्यक आहे. या आयडीद्वारे, वापरकर्त्याने युट्यूब किंवा ब्लॉगवर पेज तयार करणे आवश्यक आहे. त्यानंतर या पेजवर व्हिडिओ किंवा आर्टीकल अपलोड करणे गरजेचे आहे.
या व्हिडिओ किंवा लेखाला मॉनिटाइज करण्यासाठी गुगल अॅडसेन्सवर लॉग इन करा.  गुगलचे विविध प्लॅटफॉर्म म्हणजेच युट्यूब, ब्लॉग्ज आणि अॅडसेन्स वर एकच जीमेल आयडी उपयोगी येईल.
तुम्ही अॅडसेन्समध्ये लॉगिन केल्यानंतर, नाव, पत्ता, फोन आणि अन्य आवश्यक माहिती करा. याद्वारे तुमचे अॅडसेन्स खाते उघडले जाईल.
अॅडसेन्स मध्ये नोंदणी केल्यानंतरच व्हिडीओ किंवा लेखावर आलेल्या जाहिरातीतून आपल्याला पैसे मिळतील. जेव्हा तुमचे १०० डॉलर होतात तेव्हा गुगलतर्फे तुम्हाला एक पिन पाठविला जातो. किमान १०० डॉलर असतानाच गुगल आपल्याला पेमेंट करतो.  त्या पिनशी बँक खात्याला रजिस्टर करा. या बँक खात्यात आपल्याला गुगलकडून पैसे मिळतील.