एक Missed Call देऊन चेक करा तुमचा PF खात्यावरचा बॅलन्स

तुमचा  PF  बॅलन्स चेक करायचाय? फक्त एक  Missed Call द्या आणि घर बसल्या माहिती मिळवा

Updated: Jan 15, 2022, 05:52 PM IST
एक Missed Call देऊन चेक करा तुमचा PF खात्यावरचा बॅलन्स title=

नवी दिल्ली : नोकरदार किंवा खासगी कंपनीत काम करणाऱ्यांसाठी पीएफ ही सुविधा असते. बऱ्याचदा PF आणि EPFO ची वेबसाईट ही इतकी डाऊन असते की त्यासाठी खूप जास्त संयम बाळगावा लागतो. आता तुमच्या PF खात्यावर किती रक्कम जमा झाली हे पाहण्यासाठी तुम्हाला दरवेळी वेबसाईटवर जाण्याची गरज भासणार नाही. 

तुम्ही जर EPFO खातं काढलं असेल तर तुमच्या खात्यावर किती रक्कम जमा झाली आणि एकूण रक्कम किती आहे याची माहिती घरबसल्या तुम्हाला मिळणार आहे. यासाठी आधी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर EPFO खात्यावर रजिस्टर करावा लागेल. त्यानंतर तुम्ही 011-22901406 या नंबरवर मिस्क कॉल देऊन सगळी माहिती मिळवू शकता. 

याशिवाय तुमचा UAN नंबर अॅक्टिव्ह असेल तर तुम्हाला तुमच्या खात्यावर किती शिल्लक रक्कम आहे याची माहिती SMS द्वारे देखील मिळू शकते. यासाठी तुम्हाला EPFOHO UAN ENG असं  7738299899 या नंबरवर लिहून पाठवायचं आहे. हा SMS तुम्हाला तुम्ही जो नंबर EPFO वर दिला आहे त्याच नंबरवरून पाठवायचा आहे.  

तिसरी पद्धत म्हणजे तुम्ही वेबसाईटला भेट देऊन तिथे पासबुक बॅलन्स किती आहे ते पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला EPFO च्या वेबसाईटवर लॉगइन करावं लागेल. तुमच्या UAN नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे.  Employee Centric Services हा पर्याय निवडा. त्यानंतर Passbook हा पर्याय निवडा. तिथे पुन्हा UAN नंबर आणि पासवर्ड अपलोड करा. तुम्हाला तिथे डाऊनलोड करायचा पर्याय दिसेल.