मुंबई : यंदाच्या भीषण उष्णतेत कारमधील एसी वातावरण थंड ठेवण्यास महत्वाचा ठरतो. अशा परिस्थितीत एसी खराब झाल्यास मोठी अडचण झाल्यासारखे वाटते. कारचा एसी दुरुस्त करणे खूप महाग असते आणि या दुरुस्तीसाठी देखील खूप वेळ लागतो. परंतु अनेक वेळा एसीत काहीसा बिघाड झाल्याची माहिती आपल्याला वेळेवर मिळत नाही आणि आपण त्याचा वापर करत राहतो, त्यामुळे कारच्या एसी सिस्टिममधील बिघाड आणखी वाढतो.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की एसी खराब होण्याआधीचे तीन संकेत... हे संकेत लक्षात आल्यास तुम्ही तातडीने एसीच्या दुरूस्तीकडे लक्ष द्यायला हवे.
एसीची स्थिती जाणून घेण्यासाठी, सर्वप्रथम कार एसीचा हवा प्रवाह कसा आहे ते पहा. जर हवेचा प्रवाह कमी असेल आणि ते कमी थंड होत असल्याचे दिसून येते. कारच्या एसी काहीतरी प्रॉब्लेम असल्याचे हे संकेत असतात.
अशावेळी एसीमध्ये एकतर गळती आहे किंवा त्याच्या कॉम्प्रेसरमध्ये काही समस्या आहे. अशा परिस्थितीत एसी दुरूस्ती करण्याची गरज असते.
एसी चालू होताच मोठा आवाज येईल
तुम्ही गाडीचा एसी चालू करताच, जर इंजिनच्या बाजूने मोठा आवाज येऊ लागला, तर समजा तुमच्या एसीमध्ये काही समस्या आहे आणि ते नीट काम करत नाहीये. यामागे खराब कंप्रेसर, आतील भागांमध्ये समस्या आणि बियरिंगमध्ये समस्या असू शकते, ज्यामुळे एसी चालू असताना कार मोठा आवाज करते.
एसी चालवताना दुर्गंधी येणे
एसी चालू केल्यानंतर कारमध्ये दुर्गंधी येत असेल, तर याचा अर्थ कारच्या एअर व्हेंट किंवा बाष्पीभवनामध्ये समस्या आहे. यामुळे तुमच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे एसी तातडीने तापसून घ्यावा.