भारतात लॉकडाऊनमुळे किती फरक पडला?

लॉकडाऊन मधील परिस्थिती?

Updated: May 14, 2020, 01:54 PM IST
भारतात लॉकडाऊनमुळे किती फरक पडला? title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री देशाला संबोधित करताना लॉकडाऊन ४ चे संकेत ही दिले. मात्र यावेळी नियम वेगळे असतील असंही त्यांनी सांगितलं. हे अपेक्षित होते कारण कोरोना नियंत्रणात आल्याची अजून कोणतीही चिन्ह दिसत नाहीत. पहिल्या तीन लॉकडाऊनमध्ये भारतात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. 

लॉकडाउनच्या तीन पर्यंत कोरोनाच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ सुरुच आहे. पहिल्या टप्प्याच्या तुलनेत लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात कोरोनाच्या रुग्णांचं वाढणारं प्रमाण ६ पट अधिक आहे. हीच गोष्ट मृत्यूच्या आकडेवारीच्या बाबतीत ही आहे. युरोपियन आणि उत्तर अमेरिकन देशांच्या तुलनेत भारतातील मृत्यूचे प्रमाण कमी आहे.

केरळ आणि तेलंगणा वगळता इतर सर्व राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतेच आहे. केरळ आणि तेलंगणा ही एकमेव अशी राज्ये आहेत ज्यात दररोज कोरोनाचे रुग्ण कमी होत गेले आहेत. केरळमध्ये आता परदेशातून नागरिक परत येत असल्याने आव्हान वाढणार आहे.

कडक लॉकडाउन लागू करणार्‍या सर्व युरोपियन देशांमध्ये लॉकडाउन उघडण्यापूर्वी रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ घटली होती. युके आणि भारत यांनी लागू केलेलं लॉकडाऊन समान आहे. जेव्हा युकेमध्ये लॉकडाउन लागू झाले तेव्हा तेथे 11,000 हून अधिक रुग्ण होते. पण भारतात जेव्हा लॉकडाऊन लागू झाले तेव्हा फक्त 570 रुग्ण आढळले होते. लॉकडाउन लागू होण्यापूर्वीच ब्रिटनमध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात झाला होता.

यूकेमध्ये आता रुग्णांच्या संख्येत घट होते आहे. परंतु ब्रिटनमधील मृतांचा आकडा भारतापेक्षा जास्त आहे. भारताच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचीही मृतांचा आकडा कमीच होता. पण लॉकडाऊन ४ मध्ये जर काही प्रमाणात दिलासा दिला गेला. तर त्याच्या होणाऱ्या परिणामांसाठी देखील सरकारला तयार व्हावं लागेल. कारण यूके आणि भारत यांच्यातील लोकसंख्येमध्ये फरक आहे. भारतात लोकं किती सोशल डिस्टंसिंगचं पालन करतील याबाबत शंकाच आहे. कारण आतापर्यंत दिसलेल्या स्थितीत अनेक ठिकाणी लॉकडाऊनचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला आहे.