क्षणभरही आनंद टिकला नाही; नविन कारची पूजा करुन घरी येताना विपरीत घडलं... एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

नविन कार घेतल्यानंतर मंदिरातून देवदर्शन तसेच कारची पूजा करुन घरी परत येत असताना या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. या भीषण अपघातात नऊ महिन्यांच्या बाळासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Apr 29, 2023, 08:15 PM IST
क्षणभरही आनंद टिकला नाही; नविन कारची पूजा करुन घरी येताना विपरीत घडलं... एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू   title=

Accident : कोणावर कधी कोणती वेळ कशी येईल हे सांगता येत नाही.बऱ्यचदा अशा घटना घडतात की आनंदाचे वातावरण दुखा: त परावर्तित होते. असाच एक धक्कादायक अनुभव छत्तीसगढ़ मधील एका कुटुंबाला आला आहे. मोठ्या आनंदांने त्यांनी आपली ड्रीम कार घरी आणली. मात्र, हा आनंद क्षणभरही टिकला नाही.  नविन कारची पूजा करुन घरी येताना विपरीत घडलं. भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू  झाला आहे. मनाला चटका लावणारा असा हा अपघात आहे (Accident).

छत्तीसगडमधील बालोद येथे हा अपघात झाला आहे. नविन कार घेतल्यानंतर मंदिरातून देवदर्शन तसेच कारची पूजा करुन घरी परत येत असताना या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. या भीषण अपघातात नऊ महिन्यांच्या बाळासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

राजहरा-राजनांदगाव मुख्य मार्गावरील सहागाव गावाजवळ हा अपघात झाला आहे. बालोद जिल्ह्यातील गिधाली गावात राहणाऱ्या चंपा साहूने स्विफ्ट डिझायर कार खरेदी केली होती. कार घरी आणल्यानंतर या कुटुंबाने दुसऱ्याच दिवशी कारने देवदर्शनाला जाण्याचा बेत आखला. 

साहू आपल्या कुटुंबासह डोगरगड माँ बमलेश्वरी मंदिरात दर्शनासाठी आले होते. येथे त्यांनी सहकुटुंब देवीचे दर्शन घेतले. येथेच त्यांनी नविन कारची पूजा देखील केली. देवदर्शन आणि कारची पूजा केल्यानंतर साहू कुटुंब घरी निघाले. मात्र, परतीचा प्रवास यांच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास ठरला.

कसा झाला कारचा अपघात?

दोंडिलोहरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरगाव गावाजवळ अपघात झाला. साहू कार चालवत असताना अचानक दोन म्हशी त्यांच्या कारसमोर आल्या. या म्हशींचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात साहू यांची कार एका ट्रकवर आदळली आणि भीषण अपघात झाला. नविन कारमधून फिरणाऱ्या या कुटुंबासह अत्यंत दुख:द घटना घडली. 

या अपघातात साहू यांच्या कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे.  42 वर्षीय चंपालाल साहू यांचा मुलगा रामजी तसेच 55 वर्षीय अहेल्या साहू यांची पत्नी रामजी, 20 वर्षीय खुशी साहू यांची मुलगी चंपालाल यांचा मृत्यू झाला. याशिवाय सुमारे 9 महिन्यांचा रिद्धिक, 60 वर्षीय रामजी साहू, 36 वर्षीय यमुना साहू हे गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिकांनी तातडीने अपघातग्रस्तांना मदत केली. यानंतर काही वेळातच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. वेळेवर मदत मिळाल्याने उतर अपघातग्रस्तांचे प्राण वाचले आहेत.