अखेर पत्ता लागला, हनीप्रीत इथे बसलीये लपून

राम रहीमची मानलेली मुलगी हनीप्रीत गेल्या अनेक दिवसांपासून फरार झाली असून पोलीस तिच्या मागावर आहेत. अशातच आता ती नेपाळमध्ये लपली असल्याची माहिती समोर आली आहे.

Updated: Sep 19, 2017, 12:56 PM IST
अखेर पत्ता लागला, हनीप्रीत इथे बसलीये लपून  title=

काठमांडू : राम रहीमची मानलेली मुलगी हनीप्रीत गेल्या अनेक दिवसांपासून फरार झाली असून पोलीस तिच्या मागावर आहेत. अशातच आता ती नेपाळमध्ये लपली असल्याची माहिती समोर आली आहे.

हनीप्रीत ही नेपाळमधील बिराटनगरमध्ये लपून बसली असल्याचे कळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हनीप्रीत ही बिराटनगरमधील डेरा प्रेमी प्रीतम सिंह याच्या घरी लपली आहे.

हनीप्रीत ही इटहरीमध्ये लपल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर प्रीतम सिंहनं तिला बिराटनगरमध्ये आपल्या घरी पाठवलं. बिराटनगर हे नेपाळमधील सर्वात मोठं शहर आहे. जे इटहरी हायवेपासून २६ किमी दूर आहे. हरियाणा पोलिसांनी पंचकुलामध्ये हिंसा भडकवणाऱ्या ४३ आरोपींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये हनीप्रीतचं नाव सगळ्यात वर आहे. तसेच या यादीत डेराचा प्रवक्ता आदित्य इन्साचं देखील नाव आहे.

हनीप्रीत नेपाळमध्ये असल्याची माहिती मिळताच हरियाणा पोलीस तिला शोधण्यासाठी साध्या वेशात गेले आहेत. यात त्यांना नेपाळ पोलिसांची मदत मिळत आहे. नेपाळ पोलिसांनी दावा केलाय की, हनीप्रीतचा चेहरा नेपाळी तरूणींच्या चेह-या सारखा दिसतो. त्यामुळेच ती नेपाळमध्ये लपण्याचा प्रयत्न करत आहे. घरांमध्ये लपण्यासाठी ती खूप पैसा खर्च करत आहे.

दरम्यान, काल (सोमवार) सिरसा पोलिसांनी डेरा सच्चाची अध्यक्ष विपासना इन्सा हिची देखील चौकशी केली. तब्बल साडेतीन तास ही चौकशी सुरु होती. यावेळी तिने एक मोठी माहिती पोलिसांना दिली आहे.