घर खरेदी करणाऱ्यांसाठी खूषखबर, सरकारने दिली मोठी गूडन्यूज

आपलं स्वत:चं आणि हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. तुम्हीही घर खरेदी करण्याच्या तयारीत आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. कारण, घराचं स्वप्न पाहणाऱ्यांना व्याज सबसिडी (सूट) मिळण्यास सुरुवात झाली आहे.

Sunil Desale Updated: Mar 27, 2018, 03:16 PM IST
घर खरेदी करणाऱ्यांसाठी खूषखबर, सरकारने दिली मोठी गूडन्यूज title=

नवी दिल्ली : आपलं स्वत:चं आणि हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. तुम्हीही घर खरेदी करण्याच्या तयारीत आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. कारण, घराचं स्वप्न पाहणाऱ्यांना व्याज सबसिडी (सूट) मिळण्यास सुरुवात झाली आहे.

मध्यमवर्गीयांना होणार मोठा फायदा

नोएडा आणि ग्रेटर नोएडा या परिसरात घर खरेदी करणाऱ्या मध्यमवर्गीय आणि अत्यल्प उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. पंतप्रधान आवास योजना (पीएमएवाय) अंतर्गत या नागरिकांना गृह कर्जावर जवळपास अडीच लाख रुपयांची व्याज सबसिडी मिळणार आहे.

सरकाने यादीवर केला शिक्कामोर्तब

उत्तर प्रदेश सरकाने या दोन शहरांची नावं गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाकडे पाठवली. सरकारनेही या यादीवर शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे या शहरांत घर खरेदी करणाऱ्यांना व्याज सूट मिळणार आहे.

जानेवारी २०१७ नंतर घरं खरेदीवर सबसिडी

घर खरेदी करणाऱ्यांमध्ये ज्यांचं उत्पन्न १८ लाख रुपयांपर्यंत आहे आणि ज्यांनी जानेवारी २०१७ नंतर घर खरेदी केलं आहे अशा नागरिकांना सबसिडी मिळणार आहे. पंतप्रधान आवास योजना (पीएमएवाय) योजनेअंतर्गत लवकरच या नागरिकांना जवळपास अडीच लाख रुपयांची व्याज सबसिडी मिळणार आहे.

१५ मार्च रोजी नोटिफिकेशन प्रसिद्ध 

गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाने PMAYच्या या योजने संदर्भात काही बदल करत १५ मार्च रोजी नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं होतं. १ जानेवारी २०१७ पासून मध्यम वर्गासाठी नोएडा आणि ग्रेटर नोएडा परिसरासोबतच इतरही शहर सबसिडी स्किम अंतर्गत आणण्यात येणार आहेत. यासोबतच नॅशनल हाऊसिंग बँक (एनएचबी) आणि हाऊसिंग अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (हुडको) कडे पाठवण्यात आलं आहे.

सबसिडीसाठी बँकेशी संपर्क करा 

शहरी विकास मंत्रालयातील अधिकाऱ्याच्या मते, ज्या नागरिकांनी जानेवारी २०१७ नंतर घर खरेदी केलं आहे त्यांनी बँकेशी संपर्क साधावा. बँकेत १५ मार्चच्या नोटिफिकेशन अंतर्गत व्याज सबसिडीची प्रक्रिया सुरु करण्यासाठी सांगावं. मंत्रालयाने यापूर्वीच हुडको आणि नॅशनल हाऊसिंग बँकेला यासंबंधी माहिती दिली आहे.

९२००० घर खरेदीधारकांना मिळणार फायदा

सूत्रांच्या मते, क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम (CLSS) अंतर्गत ९२,००० घर खरेदी करणाऱ्या नागरिकांना व्याज सबसिडीचा लाभ होणार आहे. मध्यम वर्गाच्या २२,००० नागरिकांनाच याचा फायदा होणार आहे.