Holi 2024 Bank Holiday News: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 2024 साठी बँक सुट्टीची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार RBI ने राष्ट्रीय स्तरावर बँक हॉलिडे लिस्ट जारी केली आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुट्ट्या शिवाय या शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांची समावेश आहे. मार्च महिन्यात तुमचे काही बॅंकेत काम असेल तर आधी या सुट्ट्यांची यादी पाहूनच निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे तुमची फेरी वाया जाणार नाही. तसेच होळी हा सण काही दिवसांवर असून बॅंका बंद असणार आहे. मार्च महिन्यात 11 दिवस बँका बंद राहणार आहेत. होळी हा सण रविवार आला असला तर दुसऱ्यादिवशी काही राज्यांमध्ये बॅंका बंद असणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात खूप दिवस बँका पूर्ण दिवस बंद राहणार आहे. मार्च महिन्यात जवळपास 11 दिवस बँका बंद असतात. या काळात बँक बंद असल्याने तुमचे बँकेचे काम शक्य होणार नाही. असो, मार्च महिन्यात सर्व बँका बंद असतात.
आरबीआयच्या कॅलेंडरनुसार चौथ्या शनिवार आणि रविवारच्या सुट्टीनंतर धुलिंवदन म्हणजे 25 मार्च रोजी बँका बंद राहणार आहे. आगरतळा, अहमदाबाद, ऐझॉल, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद (एपी आणि तेलंगणा), इटानगर, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पणजी, रायपूर, रांची, शिलाँग आणि शिमला येथे होळी 2024 निमित्ताने बँका बंद राहणार आहेत.
17 मार्च 2024: रविवार, देशभरात बँका बंद
23 मार्च 2024: महिन्याच्या चौथ्या शनिवारमुळे देशभरातील बँका बंद आहेत.
31 मार्च 2024: रविवार, देशभरातील बँका बंद
22 मार्च 2024: बिहार दिनानिमित्त बिहारमध्ये बँक बंद
25 मार्च 2024: होळी/धुलेती/डोल जत्रा/धुलांडीच्या निमित्ताने अनेक राज्यांमध्ये बँका बंद
26 मार्च 2024 : Yaosang दुसरा दिवस / होळी बँका Yaosang मुळे अनेक राज्यांमध्ये बंद राहतील.
27 मार्च 2024: बिहारमध्ये 27 मार्चला होळीनिमित्त बँका बंद