हिंडनबर्ग पुन्हा धमाका करण्याच्या तयारीत;'भारतात काही तरी मोठं..' अदानींनतर आता कोणावर निशाणा?

Hindenburg Report: हिंडनबर्गने भारतासंदर्भात पुन्हा एकदा इशारा दिला आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Aug 10, 2024, 09:12 AM IST
हिंडनबर्ग पुन्हा धमाका करण्याच्या तयारीत;'भारतात काही तरी मोठं..' अदानींनतर आता कोणावर निशाणा? title=
हिंडनबर्ग पुन्हा धमाका करण्याच्या तयारीत

Hindenburg Report: भारताच्या इतिहासात 24 जानेवारी 2023 ही तारीख अनेकजणांच्या चांगलीच लक्षात राहिली असेल. या दिवशी देशातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती अदानी ग्रुपचे प्रमुख गौतम अदानी हे तर ही तारीख कधी विसरु शकणार नाहीत. कारण याच दिवशी अमेरिकेच्या एका शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्ग रिसर्चने अदानी ग्रुप संदर्भात एक रिपोर्ट जारी केला. यामुळे अदानी ग्रुपचे शेअर्स जोरदरा आपडलेच. पण पूर्ण देशातील शेअर बाजारावर याचा परिणाम दिसला. आता याच हिंडनबर्गने भारतासंदर्भात पुन्हा एकदा इशारा दिला आहे. 

हिंडनबर्ग रिसर्चने जानेवारी 2023 मध्ये अदानी ग्रुपच्या विरोधात एक रिपोर्ट जारी केला होता.आम्ही अदानी ग्रुपच्या शेअर्ससंदर्भात शॉर्ट पोझिशन घेऊन ठेवली आहे. भारतीय शेअर बाजारात थेट व्यवहार करण्याची परवानगी नाही. त्यामुळे त्यांनी नेमकी कोणासाठी शॉर्ट सेलिंग पोझिशन घेतली हे स्पष्ट केले नव्हते. 

हिंडनबर्ग रिसर्चचा इशारा 

हिंडनबर्ग रिसर्चने 10 ऑगस्ट रोजी सकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट लिहिली आहे. भारतात काहीतरी मोठ होणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय.

गुंतवणूकदारांवर परिणाम 

आता हिंडनबर्गच्या निशाण्यावर कोण आहे? हे त्यांनी आपल्या ट्विटमधून स्पष्ट केलं नाहीय. पण हिंडनबर्गने अशाप्रकारे इशारा देणं हे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या मनस्थितीवर नक्कीच परिणाम करणारे असते. एवढेच नव्हे तर सर्वसाधारण गुंतवणूकदारांच्या मनात पुन्हा एकदा अदानी ग्रुपसंदर्भात संशयाचे ढग जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

हिंडनबर्गची विश्वासार्हता

तर काहीजण हिंडनबर्गच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. हिंडनबर्ग रिसर्चच्या पोस्टवर आलेल्या कमेंट्सवरुन हे कळू शकते. केवळ शॉर्ट सेलिंग करुन फायदा मिळवण्यासाठी असे रिपोर्ट छापले जात असल्याचा ठपका हिंडनबर्गवर ठेवण्यात आला होता. 

गौतम अदांनीसोबत काय झालं होतं?

हिंडनबर्ग रिसर्चने गौतम अदांनीविरोधात रिपोर्ट सादर केला होता. यानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्सच्य किंमती जोरदार आपटल्या होत्या. रिपोर्ट येण्याआधी अदानी ग्रुपचे प्रमुख गौतम अदानी जगातील टॉप-5 श्रीमंतांच्या यादीत होते. पण रिपोर्ट आल्याच्या काही दिवसांनी त्यांची नेटवर्थ कमी झाली. ते जगातील टॉप 25 श्रीमंतांच्या यादीतूनही बाहेर गेले होते. असे असले तरी वर्षाच्या आत त्यांनी चांगली रिकव्हरी केली होती. ते आता भारतातील दुसरे आणि जगातील टॉप 15 श्रीमंतांच्या यादीत आहेत.