काँग्रेसने आणखी एक राज्य गमावलं...

हिमाचल प्रदेशसह काँग्रेस पक्षाने आणखी एका राज्यातील सत्ता गमावली. देशात आता कर्नाटक, पंजाब, मेघालय आणि मिझोरम या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. बाकी इतर सर्व राज्यांमध्ये भाजप आणि इतर पक्षांची सत्ता आहे. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 18, 2017, 03:58 PM IST
काँग्रेसने आणखी एक राज्य गमावलं... title=

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशसह काँग्रेस पक्षाने आणखी एका राज्यातील सत्ता गमावली. देशात आता कर्नाटक, पंजाब, मेघालय आणि मिझोरम या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. बाकी इतर सर्व राज्यांमध्ये भाजप आणि इतर पक्षांची सत्ता आहे. 

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसला पिछाडले. हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्ता होती मात्र यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने हिमाचल प्रदेशची सत्ताही गमावली. 

९ नोव्हेंबरला हिमाचलमध्ये झालेल्या निवडणुकीत ३७,८३,५८० लोकांनी मतदान केले होते. एकूण ७५.२८ टक्के मतदान झाले होते. या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपने सर्व जागा लढवल्या होत्या. एक्झिट पोलमध्येही भाजप बहुमताने जिंकणार असे भाकीत वर्तवण्यात आले होते. 

https://lh3.googleusercontent.com/-yrPQ8KDCuGM/Wjd5g-8RJ_I/AAAAAAAAz5Y/7RaY7bxq6AIE513hGOibAW3wyOPn46BMgCL0BGAYYCw/h1536/96e954b6-b58a-4ef7-a9bd-e4eafad86db1

२०१२मध्ये या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आली होती. काँग्रेसने ३६ जागा जिंकल्या होत्या तर भाजपला २६ जागांवर विजय मिळाला होता. तर अपक्षांना ६ जागा मिळाल्या होत्या.