हिमाचलमध्ये ५०० फूट दरीत कोसळली बस, २५ जणांचा मृत्यू

 ही घटना कुल्लू जिल्ह्यातील बंजार भागात घडली आहे.

Updated: Jun 20, 2019, 08:23 PM IST
हिमाचलमध्ये ५०० फूट दरीत कोसळली बस, २५ जणांचा मृत्यू title=

शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये आंबेनळी घाट दुर्घटनेसारखा प्रकार घडला आहे. एक खासगी बस ५०० फूट खोल दरीत कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. ही घटना कुल्लू जिल्ह्यातील बंजार भागात घडली आहे.

या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाल्याचं कळतं आहे. तर ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

घटनास्थळी युद्धपातळीवर मदत कार्य सुरु आहे. या खासगी बसमध्ये एकूण ५० प्रवाशी असल्याची माहिती मिळत आहे. ही खासगी बस बंजारहून गादागुशानीच्या दिशेने जात होती.

मिळालेल्या माहितीनुसार ३५ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. या ३५ जणांमध्ये १८ महिला, १० पुरुष आणि ७ लहान मुलांना बाहेर काढण्यात आले आहे.