Stocks to buy | फक्त 5 शेअर अन् एका वर्षात पैसाच पैसा... 40% पर्यंत परताव्याची क्षमता

Stock to buy | रशिया युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील शेअर बाजारांमध्ये उतार-चढ दिसून येत आहे. भारतीय बाजारही त्यातून सुटलेले नाही.

Updated: Mar 18, 2022, 03:57 PM IST
Stocks to buy | फक्त 5 शेअर अन् एका वर्षात पैसाच पैसा... 40% पर्यंत परताव्याची क्षमता title=

मुंबई : रशिया युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील शेअर बाजारांमध्ये उतार-चढ दिसून येत आहे. भारतीय बाजारही त्यातून सुटलेले नाही. परंतू आता मार्केट सपोर्टझोनवरून तेजी पकडण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज हाऊस शेयरखानने लॉंगटर्मसाठी काही शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअर्समध्ये पुढील एका वर्षासाठी गुंतवणूक केल्यास 40 टक्क्यांपर्यंतचा परतावा मिळू शकतो.

Kalpataru Power Transmission Limited

कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन लिमिटेडमध्ये ब्रोकरेज हाऊसने खरेदीचा सल्ला दिला आहे. त्यासाठी प्रति शेअर लक्ष्य 514 रुपये ठेवल आहे. सध्याच्या किंमतीचा  विचार केल्यास प्रति शेअर 144 रुपयांचा परतावा म्हणजेच 39 रुपयांचा परतावा मिळू शकतो.

HDFC Bank Limited

HDFC बँक लिमिटेडमध्ये ब्रोकरेज हाऊसने खरेदी करण्याचा सल्ला दिला असून, प्रति शेअर लक्ष्य 1810 रुपये ठेवली आहे. सध्याची किंमत 1478 रुपये असून, प्रति शेअर 332 रुपयांचा परतावा मिळू शकतो.

Divi's Laboratories Ltd

डीवीस लॅबोरटोरिसमध्ये ब्रोकरेज हाऊसने खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी 5620 रुपयांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सध्याची किंमत 4513 रुपयांवरून साधारण 1107 रुपयांचा प्रतिशेअर परतावा मिळू शकतो.

HCL Technologies Ltd

एचसीएल टेक लिमिटेडमध्ये ब्रोकरेज हाऊस शेअरखानने खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी प्रतिशेअर लक्ष्य 1550 रुपये ठेवले आहे. याप्रकारे सध्याची किमत म्हणजे 1994 रुपयांवरून प्रति शेअर 356 रुपये किंवा साधारण 30 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.

UPL Ltd 

युपीएल लिमिटेडचे शेअरमध्येही खरेदीची देण्यात आला आहे. त्यासाठी 930 रुपये लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सध्याची किंमत 762 रुपयांच्या आसपास आहे. लक्ष्य किंमतीचा विचार केल्यास 168 रुपयांपर्यंत म्हणजेच 22 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.